agriculture news in marathi Heavy rains in some places in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

पुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी सरी ढगफुटीसारख्या पडत आहेत. त्यामुळे कमी वेळात अधिक पाऊस होत आहे.

पुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी सरी ढगफुटीसारख्या पडत आहेत. त्यामुळे कमी वेळात अधिक पाऊस होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा असल्याची स्थिती आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. सकाळपासून कडाक्याचे ऊन पडत आहे. तरी, दुपारनंतर काही ठिकाणी अचानक ढग भरून येत आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस पडत आहे. कमी वेळात धो-धो पाऊस पडत असल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे. मुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नाल्यांना पूरस्थिती तयार होत आहे.

वाहतूक बंद सारखे प्रकार होत आहे. काही ठिकाणी शेतातील पिकांसह माती वाहून जात असल्याची स्थिती आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. 

हवेली तालुक्यातील पुणे शहर १६.८, केशवनगर १६.८, खडकवासला २२.८, चिंचवड १०.३, तर कळसमध्ये ११.८ मिलिमीटर पाऊस पडला. थेऊर, खेड,भोसरी, हडपसर, वाघोली, कोथरूड येथे हलक्या सरी पडल्या. भोरमधील नसरापूर १६.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर, किकवी, संगमनेर, निगुडघर येथेही पावसाचा शिडकावा झाला. मावळमधील तळेगाव २२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खेडमधील पाईट २१.३, आळंदी २२.३ मिलिमीटर पाऊस पडला असून चाकण राजगुरुनगर, कुडे,  कन्हेरसर, कडुस हलका पाऊस पडला. 

बारातमती, इंदापुरात पुन्हा जोरदार

बारामतीतील सुपा १०.०, उंडवडी ११.५ मिलिमीटर तर मोरगाव, माळेगाव, पणदरे, लोणी, इंदापूरमधील भिगवण, इंदापूर, लोणी, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर. दौंडमधील पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी येथेही पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...