Agriculture news in Marathi Heavy rains in sparse places in the state | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

पुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

खालापूर, माणगाव, सावंतवाडी, तलासरी, लांजा भागात पावसाने अक्षरशः धुऊन टाकले. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत असून या पावसामुळे काढणी केलेली भात भिजली असून अनेक ठिकाणी काढलेली भात भिजत आहेत. पावसामुळे अजूनही ओढे नाले खळाळून वाहत असल्याने भात पिकांच्या नुकसानीत वाढ होऊ लागली आहे.

या पावसामुळे खरिपातील पिके मातीमोल झाली आहेत. त्यात पुन्हा भर पडत असल्याने शेतकरी अडचणीत आला असून सरकारने मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात पावसाचा कमीअधिक असल्याने भात काढणी खोळंबत असल्याची स्थिती आहे.

मध्य महाराष्ट्रात दिवसभर ऊन पडत असले तरी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत आहे. सायंकाळी काही ठिकाणी काळेकुट्ट ढग जमा होत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असून कमी वेळात जास्त पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. सकाळपासून शेतकरी कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर काढणीच्या कामाला लागला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही शेतात पाणीच पाणी असल्याने पीक हातातून गेल्याने शेतकरी शेतात फिरकत नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र, त्याला फारसा वेग नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे.  

बुधवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर ः (स्रोत - हवामान विभाग)
कोकण : कुलाबा ३३, डहाणू २५.३, मोखेडा १८.८, तलासरी ३२.२, खालापूर ३०, माणगाव ३८, चिपळूण २३, लांजा ३७, राजापूर १३, रत्नागिरी १२.३, संगमेश्वर ११, कणकवली २३, कुडाळ १९, सावंतवाडी ४६.
मध्य महाराष्ट्र ः अकोले १३, पारनेर २८, राहता १६, राहुरी १९, संगमनेर २७, शेवगाव १३, श्रीरामपूर २५, भुसावळ ११, जामनेर २९, आजरा ४०, चंदगड २०, गगणबावडा २४, हातकणंगले १८, कागल २४, करवीर १४.८, पन्हाळा ३०, राधानगरी ११ , शाहूवाडी २८, शिरोळ ५५, हर्सूल ३९.४, मुल्हेर १४, ओझरखेडा ३६.८, सिन्नर १०, सुरगाणा ५७.२, त्र्यंबकेश्वर १०, पुणे ४८.४, पुरंदर २३, जत १५, कवठेमहांकाळ ३६, मिरज ३५.४, पलुस ३२, सांगली ४५.६, शिराळा ३६, तासगाव ३३, वाळवा १७, कराड १२.
मराठवाडा : गंगापूर ५८, खुल्ताबाद १४.
विदर्भ : सिरोंचा २२.२.


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...