Agriculture news in marathi Heavy rains in two circles in Aurangabad, Jalna | Agrowon

औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत सोमवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत सोमवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. तर, उस्मानाबाद, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांतील मंडळांत हलका, ते मध्यम पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५१ मंडळांत पावसाची हजेरी लागली. नाचनवेल मंडळात सर्वाधिक १३४ मिलिमीटर पाऊस झाला. १० मंडळात मध्यम ते दमदार, तर इतर मंडळांत तुरळक पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १९, बीड जिल्ह्यातील १७, लातूरमधील २०, उस्मानाबादमधील १, परभणीतील १० मंडळांत तुरळक पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील तीन मंडळांत मध्यम, तर १६ मंडळांत तुरळक पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील पाऊस झालेल्या २६ मंडळांपैकी दाभाडी मंडळात ७९.३ मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली. ६ मंडळात मध्यम तर इतर मंडळात तुरळक हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ५० मंडळात हजेरी लावणारा पाऊस ८ मंडळात मध्यम ते दमदार तर ४२ मंडळात तुरळक हलक्या स्वरूपात बसला. 

जिल्हानिहाय पावसाची मंडळ (पाऊस मि.मी)

औरंगाबाद जिल्हा ः कन्नड २२, करंजखेडा २१, चापानेर ३४, सोयगाव ३६.५, गंगापूर ४७, बालानगर ४३.८, आडुळ ३८, अजिंठा २६, कोळेगाव ३५.

हिंगोली जिल्हा ः डोंगरकडा ३१.३, वारंगा ४३.८, टेम्भूर्णी ३४.८

जालना जिल्हा ः हसनाबाद २३.८, राजुर २९.३, केदारखेडा २८.५, वाघरुळ २४, धनगर पिंपरी २४.८, रांजणी ३२.८.

नांदेड जिल्हा ः लोहा २६.६, कापसी २६.६, सोनखेड ५३.३, शेवडी २६.६, कळंबा २६.६, भोकर ३०.३.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...