Agriculture news in marathi Heavy rains in two circles in Jalna, Aurangabad | Agrowon

जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा कमी-अधिक प्रमाणात असलेला जोर शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत काही अंशी कमी झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा कमी-अधिक प्रमाणात असलेला जोर शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत काही अंशी कमी झाल्याचे चित्र आहे. औरंगाबादमधील पाचोड व जालन्यातील सुखापुरी या दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. तर, इतर मंडळांत तुरळक पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ मंडळांत पावसाने हजेरी लावली. ३८ मंडळांत तुरळक, हलका, मध्यम स्वरूपाचा पडलेला पाऊस पाचोड मंडळात तब्बल १२८ मिलिमीटर बरसला. धगफुटीगत झालेल्या या पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील २२ मंडळात पावसाची हजेरी लागली.

जिल्ह्यातील सुखापुरी मंडळात ६८.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ३४ मंडळांत तुरळक हलका, मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ३५, नांदेडमधील २३, परभणीतील २१ मंडळात हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील आंबा मंडळात २४.८,जवळा मंडळात ३३ मिलिमीटर व इतर २६ मंडळात तुरळक हलका पाऊस झाला.

गुरुवारी जोरदार पावसामुळे कडेठाण, सुलतानपूर, पारुंडी परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. आडूळ परिसरात सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. 

कपाशीच्या पिकात पाणी तुंबल्याने बोन्डे काळी पडून सडली आहेत. यामुळे अतोनात नुकसान झाले. बाजरी आडवी पडली आहे. निसर्गापुढे हतबल झालो आहे. 
- विकास तवार, शेतकरी, कडेठाण. 


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...