Agriculture news in marathi Heavy rains in two circles in Jalna district | Agrowon

जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यातील मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यातील मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील २ मंडळात अतिवृष्टी झाली. तर, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंधी मंडळात झालेला २३ मिलिमीटर पाऊस वगळता इतर ५२ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१, बीड जिल्ह्यातील ४२, हिंगोली जिल्ह्यातील १७, तर लातूर जिल्ह्यातील ३२ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव मंडळात २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील ३९ मंडळांत हजेरी लावणारा पाऊस सातोना व सुखापुरी मंडळात अतिवृष्टी रुपात बरसला. सातोना मंडळात ७१.३ मिलिमीटर, तर सुखापुरी मंडळात सर्वाधिक १२३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील वाटूर मंडळात ३६ मिलिमीटर, वडीगोद्री २३.५, अंबड २०.८, तर केदारखेडा मंडळात २१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

परभणी जिल्ह्यातील वालुर मंडळात ३७ मिलिमीटर, तर कुपटा मंडळात ४८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ४९ मंडळात हजेरी लावणारा पाऊस पैठण तालुक्यातील अनेक मंडळात दमदार स्वरूपात बरसला. पैठण तालुक्यातील लोहगाव मंडळात सर्वाधिक ६०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली त्यापाठोपाठ ढोरकीन मंडळात ५३.३, बिडकीन ३४.२,पाचोड ४२.२ विहामांडवा ३४.२, नांदर ३४.२,बालानगर ३८.५, तर पिंपळवाडी मंडळात ३४.२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील वडोद बाजार मंडळात ३१.३ पिरबावडा मंडळात २६.५ फुलंब्री मंडळात पंचवीस पॉईंट आठ, तर वाळूज मंडळांत ४८ पॉईंट तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...