बीड जिल्ह्यातील युसुफ वडगावात जोरदार पाऊस

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील काही मंडळांत शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, तर काही मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला.
 Heavy rains in Yusuf Wadgaon in Beed district
Heavy rains in Yusuf Wadgaon in Beed district

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील काही मंडळांत शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, तर काही मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव मंडळांत ६५ मिलिमीटर पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ३५ मंडळात तुरळक ते मध्यम पाऊस झाला. अजिंठा मंडळात ३६.८ मिलिमीटर, करंजखेड ६०.८, चिंचोली २९.५, पीशोर ३९.३, चिकलठाणा ३५.४, कन्नड मंडळात ४२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कन्नड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील ३२ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील पांगरी मंडळात २१.३, तळणी ४१, मंठा २१.३, तर दाभाडी मंडळात ३५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यातील ३४ मंडळांत पाऊस झाला. देवणी मंडळात सर्वाधिक ४४.८ मिलिमीटर, तर झरी २९.५, लामजना २३.३ व गातेगाव मंडळात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ मंडळांत तुरळक पावसाच्या सरी आल्या. 

बीड जिल्ह्यातील २९ मंडळांत पावसाची हजेरी लागली. बहुतांश मंडळात तुरळक बरसणारा पाऊस युसुफ वडगाव मंडळात अति बरसला. या मंडळात ६५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ बरदापूर  मंडळात ३५.५, लोखंडी सावरगाव २८.८, हनुमंत पिंपरी २५, धर्मपुरी २५.३, तर बनसारोळा मंडळात ५०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर मंडळात हलका‍ पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com