Agriculture news in marathi Heavy showers in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत लोणावळा येथे १३३.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाले आहे.

पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत लोणावळा येथे १३३.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाले आहे. त्यामुळे भात खाचरात पाणी साचले असून ओढे नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रात पाणी वाढले असून धरणातील पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भात रोपांची पुर्नलागवडी व रखडलेल्या भात लागवडीची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. सोमवारी (ता. ३) रात्रीपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. पश्चिम पट्यात पावसाचा जोर चांगला असला तरी पूर्व पट्यात हलक्या सरी बरसत होत्या. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला. 

जुलै अखेरीस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भात पट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर तालुक्यात भात लागवड रखडली होती. पावसाची अत्यंत गरज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले. ज्याच्या भात लागवडी रखडल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी लागवडी सुरू केल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातही पावसाचा जोर कमी झाल्याने पिके पावसाच्या प्रतिक्षेत होती. काही भागात उन्हाचा पारा वाढला होता. त्यामुळे ढगाळ राहणाऱ्या वातावरणामुळे पिके अडचणीत आली होती. दोन दिवसांपूर्वी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मंगळवारी जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर, दौंड, हवेली, खेड, पुरंदर या तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असलेल्या बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाल्याने पिकेही तरारली आहेत. 

बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत- कृषी विभाग) हवेली - पुणे शहर ६०.० केशनवगर ३७.५, कोथरूड ८२.५, खडकवासला ६१.८, थेऊर २३.३, खेड ७८.५, भोसरी ३२.०, चिंचवड ३९.०, कळस २२.०, हडपसर ३६.३, वाघोली २३.५. 
मुळशी - पौड १२६.०, घोटावडे १०८.५, थेरगाव ७६.०, माले १०८.०, मुठे ११२.०, पिरंगूट ९९.५ 
भोर - भोर १०३.८, भोलावडे १३०.८, नसरापूर ११५.३, किकवी ९१.८, वेळू ७८.५, आंबवडे १०५.३, संगमनेर ९७.५, निगुडघर १०७.८ 
मावळ - वडगाव मावळ ६९.८, तळेगाव ४०.३, काले ७९.८, कार्ला ११३.०, खडकाळा ७५.५, लोणावळा १३३.०, शिवणे ६९.५ 
वेल्हा - वेल्हा १०९.८, पाणशेत ११४.८, विंझर १०५.५, अंबावणे ११३.५ 
जुन्नर - जुन्नर २७.०, नारायणगाव २१.५, वडगाव आनंद २१.५, निमगाव सावा २०.०, डिंगोरे ६०.०, आपटाळे ४४.८, 
खेड - वाडा ४२.८, राजगुरूनगर २८.८, कुडे २९.८, पाईट ३२.८, चाकण ४३.८, आळंदी २९.५, कन्हेरसर २०.३, कडूस २८.० 
आंबेगाव - घोडेगाव २७.०, कळंब २०.५, मंचर २३.३ 
शिरूर - पाबळ २०.०, 
बारामती - लोणी २४.५, सुपा २१.५, मोरगाव २१.५, 
पुरंदर - सासवड ४८.३, भिवंडी ५६.८, कुंभारवळण ३५.८, जेजूरी ३६.५, परिंचे ३८.८, राजेवाडी २५.०, वाल्हा ३७.८ 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...