agriculture news in Marathi heavy transport from hivarebajar Maharashtra | Agrowon

हिवरेबाजारमधून जड वाहतूक 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

देशात लॉकडाऊन असल्याने भाळवणी-पारनेर व विळद बाह्यवळण रस्ते बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील अवजड वाहतूक हिवरेबाजारमधून होऊ लागली आहे.

नगर ः देशात लॉकडाऊन असल्याने भाळवणी-पारनेर व विळद बाह्यवळण रस्ते बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील अवजड वाहतूक हिवरेबाजारमधून होऊ लागली आहे. या वाहतुकीमुळे हिवरेबाजारमध्ये नागरी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही अवजड वाहतूक त्वरित थांबवावी, अशी विनंती हिवरेबाजार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. 

गेली ३० वर्षे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आदर्श गाव हिवरेबाजार उभे केले. येथील रस्ते १० ते १२ वर्षे होऊनही सुस्थितीत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे भाळवणी- पारनेर व विळद बाह्यवळण रस्त्यांवर नाकेबंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक हिवरेबाजारमार्गे होत आहे. त्यामुळे हिवरेबाजारचे रस्ते लवकर खराब होण्याची भीती आहे.

हिवरेबाजार गावठाणाअंतर्गत सर्वत्र फूटपाथ केले असून, फूटपाथवरून अवजड वाहने गेल्यास पेव्हर ब्लॉक तुटतात. तसेच, रस्त्यावरच्या उंच वाहनांच्या वाहतुकीमुळे तीन ते चार वेळा विद्युत तारा तुटल्या होत्या. जड वाहतूक सुरू राहिल्यास चार महिन्यांत संपूर्ण रस्ते खराब होतील. रस्तेदुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच कोटी खर्च येईल.

मात्र, निधीअभावी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करता येणार नाहीत. त्यामुळे अवजड वाहतूकदारांनी हिवरेबाजारमधून अवजड वाहतूक करू नये, अशी विनंती केली आहे. 
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...