विदर्भात दणका; मराठवाड्यात जोरदार

२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे नागरधन २४५, रामटेक २०१, कान्हान २४५, निमखेडा २४५, मौदा २६३, चाचेर २८१, कोडामेंडी २९१ (सर्व नागपूर), आहेरी २८०, अल्लापाल्ली २१२, देसाईगंज २२९ (सर्व गडचिरोली).
पालमजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांना नाला ओलांडताना कसरत करावी लागली.
पालमजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांना नाला ओलांडताना कसरत करावी लागली.

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने विदर्भाला दणका दिला असून नागपूर, गडचिरोलीत धूमशान घातले आहे. तर, नांदेडसह मराठवाड्यातील काही भागांत पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अाहे. मराठवाडा आणि विदर्भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नागपूरमध्ये आणि नांदेडध्ये आठ जणांचा मृत्यू झाला अाहे. आजपासून (ता. २२) पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  नागपूरमधील रामटेक, पारशिवणी, मौदा, गडचिरोलीतील अेहरी, देसाईगंज तालुक्यात धुव्वाधार पाऊस पडला. नागपूरमध्ये घर कोसळून तिघांचा मृत्यू झाला, तर पारशिवणी तालुक्यातील आमडी येथे सदाशिव सातपैसे (वय ४२) हे वाहून गेले. पूर्व विदर्भातसह वऱ्हाडात पावसाने जोरदार पुनरागमन केले. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वान प्रकल्पाची पातळी झपाट्याने वाढत असून, प्रकल्पातून पाणी सोडले जाणार असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वाशीम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सखल भागात पिकांमध्ये पाणी साचलेले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने १४ हजार हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. 

मराठवाड्यात ८५ मंडळांत पावसाने धुमाकूळ घातला असून, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये जोर अधिक होता. नांदेड जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवाय पुरात वाहून गेलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्‍यातील ६४ हजार ७८० हेक्‍टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. या विसर्गामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी वाढणार आहे. पुणे जिल्ह्यातही धरणांमध्येही पाण्याची आवक वाढल्याने धरणातून पाणी साडण्यात येत आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून भीमा, मुळा-मुठा, निरा नदीला पूर आला आहे. नगर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची संततधार सुरू होती, तर अन्य भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्‍यात जोरदार पाऊस सुरूच असल्याने भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातही सर्वदूर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. भीमानदी ओसंडून वाहत असल्याने उजनी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. 

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग)  

कोकण : किन्हवळी ८२, पोयंजे ६०, तलोजे ७०, मोराबे ६०, कर्जत ८५, नेरळ १३१, कडाव ८०, कळंब १०५, कशेळे ७९, खालापूर चौक ८८, खोपोली ७०, हमरापूर १०८, कासू ६०, निझामपूर ६०, वाकवली ६३, वेळवी ६१, कोंडेगाव ६२, दवेळे ६३, आंबोली ८८. 

मध्य महाराष्ट्र : तोरणमाळ ७५, पातोंडा ६२, रिंगणगाव ८१, बहाळ ६२, हातले ६०, तोंडापूर ६२, भडगाव ६३, कोळगाव ६१, मुठे ९८, भोलावडे ८२, काले ६४, लोणावळा ९६, महाबळेश्‍वर ८७, तापोळा १४३, लामज १५८, आंबा ७७. 

मराठवाडा : पिंपळगाव ७३, नांदेड शहर ७८, नांदेड ग्रामीण ७९, वजीराबाद ८२, तुप्पा ७५, वसरणी ८४, विष्णुपुरी ८०, लिंबगाव ९०, तरोडा ७८, बिलोली ८२, कुंडलवाडी ८६, अदमपूर ८७, लोहगाव ८१, मुखेड ८०, कंधार ८५, कुरूळा ११४, फुलवळ ११९, पेठवडज ११७, उस्माननगर ११७, बारूळ १०३, लोहा ७२, माळाकोळी ९१, कापसी ७५, सोनखेड ८५, शेवडी ७०, कलंबर ११७, हदगाव ९६, तळणी ८६, पिंपरखेड ९८, आष्टी १०१, भोकर १०९, मोघाळी ९०, मातूळ ९६, किनी ८२, शहापूर ८७, किनवट ८३, इस्लापूर ६५, शिवणी ८५, मुदखेड १०२, मुगट ८५, बारड ९१, हिमायतनगर १३०, जवळगाव ९५, सरसम ९५, धर्माबाद ७१, करखेली ८८, उमरी ११८, गोळेगाव ११३, सिंधी १२७, अर्धापूर ७७, दाभड ७५, बरबडा ७४, कुंटूर ७८, नरसी ७६, नायगाव ८२, माजंरम ९४, पाथरी ७४, हादगाव ७७, पूर्णा ७१, ताडकळस ८४, देऊळगाव ८०, हिंगाली ८१, बासंबा ८२, माळहिवरा ७८, कळमनुरी ९०, नांदापूर ९५, हयातनगर ७४, औंढा ८७, येहळेगाव (तूकाराम) ७९, साळवा ७७, जवळा ९३.

विदर्भ : चिखलदरा ११०, सेमडोह १५५, चुर्णी १५४, वाडी १२७, हुडकेश्‍वर १३०, कामठी १७७, वडोदा १९५, दिघोरी १७६, नागरधन २४५, रामटेक २०१, मुसेवाडी १५६, आमडी १५२, कान्हान २४५, निमखेडा २४५, मौदा २६३, खाट १७६, धानळा १८२, चाचेर २८१, कोडामेंडी २९१, कुही १५७, पाचखेडी १०६, वेलतूर १५४, राजोली १६०, तितूर १५२, शहापूर १७४, भंडारा १५४, धारगाव १२०, बेला १४३, पहेला १२०, खामारी १४७, मोहाडी ११६, वार्थी १२५, केंद्री १७०, अड्याळ ११७, कोंढा १२८, चिंचळ १२०, आकोडी १२५, सांगडी १२६, मासाळ १०२, पोहारा १७०, लाखनी १८५, पालंदूर १२३, बोधगाव देवी १२६, अर्जुनी ११७, महागाव १३०, सौदाद १२०, गांगळवाडी १२६, चौगण १५६, बल्लारपूर १०७, गडचिरोली १५०, येवळी १३८, ब्राह्मणी १२०, अरमोरी ११६, पिसेवढथा १२२, वैरागड १२०, पेंटीपका १०५, असारळी १२१, आहेरी २८०, अल्लापाल्ली २१२, मुरूमगाव ११२, देसाईगंज २२९, शंकरपूर १६०, मुलचेरा १६६.  पाऊस आेसरणार? दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत धुव्वाधार कोसळणारा पाऊस आजपासून (ता. २२) आसेरण्याची शक्यता अाहे. मध्य प्रदेशालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळत असल्याने पाऊसही कमी होणार आहे. आज कोकणात अनेक ठिकाणी तर उर्वरीत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com