agriculture news in Marathi, Heavy water shortage in Buldana district | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

बुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यातील पाणीटंचाई अतितीव्र झाली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टॅंकर सुरू असलेल्या गावांमध्ये पाण्यावरून किरकोळ वादविवाद होऊ लागले. शेगाव तालुक्यातील चिंचोली (कारफार्मा) या गावात दोन दिवसांपूर्वी टॅंकर आल्यानंतर पाणीवाटपाच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नंतर ही परिस्थिती सुरळीत झाली. 

बुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यातील पाणीटंचाई अतितीव्र झाली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टॅंकर सुरू असलेल्या गावांमध्ये पाण्यावरून किरकोळ वादविवाद होऊ लागले. शेगाव तालुक्यातील चिंचोली (कारफार्मा) या गावात दोन दिवसांपूर्वी टॅंकर आल्यानंतर पाणीवाटपाच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नंतर ही परिस्थिती सुरळीत झाली. 

जिल्ह्यात सद्यःस्थितीत २२६ गावांत २३८ टँकरने पाणी पुरविले जात आहे. तर, ४२८ गावांमध्ये ५९१ उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी २१५ गावांत २८३ कामांना मंजुरी देण्यात आली. ११३ गावांतील १५५ कामे पूर्ण झाली आहेत. ११० गावांत नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली. २२७ गावांमध्ये ७२७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात संतनगरी शेगावला लागून असलेल्या चिंचोली या ५००० लोकसंख्येच्या गावात पाणीटंचाईचा कहर झालेला आहे. दरम्यान, या गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा अहवाल पंचायत समितीला दिला होता. या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. चिंचोलीप्रमाणेच इतर गावांची स्थिती झालेली आहे. 

सर्वच प्रकल्पांतील पाणी शेवटच्या टप्प्यात आले असून, सव्वा दोनशेपेक्षा अधिक गावांतील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे.

प्रतिक्रिया
टँकर आल्यानंतर काही जण त्यावर चढून पाणी काढण्याचा प्रयत्न करायचे. यामुळे एखादी दुर्घटना घडू शकली असती. परिणामी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन दिवसांपूर्वी तात्कालिक पोलिस बंदोबस्तात पाणीवाटप केले. आता सुरळीतपणे पाणीवाटप पूर्वीसारखे सुरू आहे.
- पी. आर. वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शेगाव

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...