भंडारदरा जलाशय भरले !

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून सकाळी सहा वाजता भंडारदरा जलाशय भरले आहे.
भंडारदरा जलाशय भरले !
भंडारदरा जलाशय भरले !

अकोले, जि. अहमदनगर : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून सकाळी सहा वाजता भंडारदरा जलाशय भरले आहे. पाणी नियंत्रण साठी व येणारी पाण्याची आवक पाहता स्पिल वे मधून २४३६ क्युसेकने पाणी प्रवरा नदीत झेपावले आहे, तर वीजकेंद्र एक मधून ८३२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वाकी जलाशयातून  २५४५ क्यूसेक ने पाणी वहात असल्याने प्रवरा नदीतून सुमारे ६५०० क्युसेस वेगाने पाणी सुरू झाले आहे. विसर्ग दुपारी वाढविण्यात येईल असे जलसंपदा विभागाने सांगितले असून जलशात खालील व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काल (ता.१५) जलाशयात १०००१ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. मात्र रात्री जोरदार वृष्टी झाल्याने धरणातील आवक ८०१ दशलक्ष घनफूट आल्याने कार्यकारी अभियंत्यांनी सकाळी ६ वाजता जलाशय भरल्याचे जाहीर करून सांडव्यातून पाण्याने गुळणी फेकून पाणी प्रवरा पात्रात झेपावले. यावेळी अधिकाऱ्यांनी जलाशयात नारळ, साडी अर्पण करून पूजा केली. काल झालेल्या पाऊस घाटघर २४५, रतनवाडी २४०, पांजरे २३०, भंडारदरा १७५ मिलीमीटर नोंद झाली. सर्वाधिक पाऊस घाटघर येथे १०इंच पडला त्यामुळे सर्व परिसर जलमय झाला. 

दरम्यान, भंडारदरा जलाशय भरल्याचे लाभक्षेत्रातील आनंद द्विगुणित असला तरी पाणलोटात अधिक पावसामुळे अनेक संकट व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा आला की जनावरे अतिवृष्टीमुळे दगावतात भातपिके सडतात, रस्ते खराब तर बांध बंदिस्त फुटतात त्यामुळे आदिवासी माणसे चिंतेत असतात. भंडारदरा, कोदनी वीजप्रकल्प सुरू झाले असून तालुक्यातील दहा लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com