हरभरा खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता निश्‍चित 

शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी निश्‍चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.
gram
gram

परभणी ः यंदाच्या (२०२०-२१) हंगामात हमीभावाने, ५१०० रुपयांनी ६ लाख १७ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी निश्‍चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या वर्षी बुलडाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक १५ क्विंटल ८२ किलो तर रायगड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. काही जिल्ह्याची उत्पादकता कमी आली आहे तर काही जिल्ह्याची उत्पादकता गतवर्षी एवढीच आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना,औरंगाबाद या जिल्ह्यांच्या उत्पादकता वाढली आहे तर हिंगोली जिल्ह्याची उत्पादकता कमी झाली आहे. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ‘नाफेड’तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

जिल्हानिहाय निश्‍चित करण्यात आलेल्या उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करावी, असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आले आहेत.  जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी हरभरा उत्पादकता (क्विंटलमध्ये)  जिल्हा : उत्पादकता  परभणी : ८.००  हिंगोली : १०.३२  नांदेड : १०.१५  लातूर : १३.५०  उस्मानाबाद : ७.५०  बीड : १०.००  जालना : ११.००  औरंगाबाद : ७.१०  बुलडाणा : १५.८२  अकोला : १४.००  वाशीम : ८.५०  यवतमाळ : १०.००  अमरावती : १४.५०  वर्धा : १२.००  नागपूर : ११.२०  भंडारा : ९.००  गोंदिया : ८.७०  चंद्रपूर : ७.५०  गडचिरोली : ७.००  नाशिक : ७.९०  धुळे : ११.००  नंदूरबार : १०.९८  जळगाव : १०.९०  नगर : ८.५०  पुणे : ९.४१  सोलापूर : ६.५०  सातारा : १०.००  सांगली : ११.४०  कोल्हापूर : ९.९५  ठाणे : ७.०१  पालघर : ७.२८  रायगड : ४.१८  रत्नागिरी : ४.७९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com