agriculture news in Marathi per hector chana productivity for procurement announced Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हरभरा खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता निश्‍चित 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

 शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी निश्‍चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

परभणी ः यंदाच्या (२०२०-२१) हंगामात हमीभावाने, ५१०० रुपयांनी ६ लाख १७ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी निश्‍चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या वर्षी बुलडाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक १५ क्विंटल ८२ किलो तर रायगड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. काही जिल्ह्याची उत्पादकता कमी आली आहे तर काही जिल्ह्याची उत्पादकता गतवर्षी एवढीच आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना,औरंगाबाद या जिल्ह्यांच्या उत्पादकता वाढली आहे तर हिंगोली जिल्ह्याची उत्पादकता कमी झाली आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ‘नाफेड’तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

जिल्हानिहाय निश्‍चित करण्यात आलेल्या उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करावी, असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आले आहेत. 

जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी हरभरा उत्पादकता (क्विंटलमध्ये) 
जिल्हा :
उत्पादकता 
परभणी : ८.०० 
हिंगोली : १०.३२ 
नांदेड : १०.१५ 
लातूर : १३.५० 
उस्मानाबाद : ७.५० 
बीड : १०.०० 
जालना : ११.०० 
औरंगाबाद : ७.१० 
बुलडाणा : १५.८२ 
अकोला : १४.०० 
वाशीम : ८.५० 
यवतमाळ : १०.०० 
अमरावती : १४.५० 
वर्धा : १२.०० 
नागपूर : ११.२० 
भंडारा : ९.०० 
गोंदिया : ८.७० 
चंद्रपूर : ७.५० 
गडचिरोली : ७.०० 
नाशिक : ७.९० 
धुळे : ११.०० 
नंदूरबार : १०.९८ 
जळगाव : १०.९० 
नगर : ८.५० 
पुणे : ९.४१ 
सोलापूर : ६.५० 
सातारा : १०.०० 
सांगली : ११.४० 
कोल्हापूर : ९.९५ 
ठाणे : ७.०१ 
पालघर : ७.२८ 
रायगड : ४.१८ 
रत्नागिरी : ४.७९ 


इतर अॅग्रो विशेष
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...