Agriculture news in marathi Per hector productivity fixed for 33 districts in the state | Agrowon

राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी हरभरा उत्पादकता निश्चित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

परभणी : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत सन २०१९-२० च्या हंगामात (प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये) हरभरा खरेदी करण्यासाठी कृषी विभागाचा सुधारित अंदाज आला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. सुधारित उत्पादकतेनुसार हरभरा खरेदी करण्याचे आदेश पणन विभागातर्फे देण्यात आले. 

परभणी : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत सन २०१९-२० च्या हंगामात (प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये) हरभरा खरेदी करण्यासाठी कृषी विभागाचा सुधारित अंदाज आला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. सुधारित उत्पादकतेनुसार हरभरा खरेदी करण्याचे आदेश पणन विभागातर्फे देण्यात आले. 

सुधारित अंदाजानुसार राज्यात यवतमाळ जिल्ह्यासाठी सर्वाधिक १८ क्विंटल ४२ किलो, तर रायगड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसींतर्गंत शेतकरी उत्पादक कंपन्यातर्फे हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या व्दितीय अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकता कळविण्यात आली होती.

आता कृषी विभागाने जिल्हानिहाय सुधारित उत्पादकता उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या उत्पादकतेत सुधारणा करण्यात येत आहे. 

सुधारित अंदाजानुसार, जिल्हानिहाय हरभऱ्याची खरेदी करावी, असे आदेश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाचे उपसचिव (पणन) का. गो. वळवी यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, ‘महाएफपीसी’चे व्यवस्थापकीय संचालक, भारतीय अन्न महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. 

जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये) 

जिल्हा. पूर्वीची उत्पादकता. सुधारित उत्पादकता 
परभणी ७.५०. ८.६८ 
हिंगोली १३ ९.८५
नांदेड १७.०८ 
लातूर ६.५० ११.२९ 
उस्मानाबाद ६.२५. ८.०५ 
बीड ११.५६ 
जालना ६.८७ १०.५८ 
औरंगाबाद ५.५० ९.६२ 
बुलडाणा ६.५०. 
१४.१२  
अकोला १३ १३.०६ 
वाशिम ७.४० ८.४७ 
अमरावती १२ १४.४३ 
यवतमाळ ११.७० १८.४२ 
वर्धा १२.१० 
९.२९   
नागपूर १२.५०
१०.८५   
भंडारा ५.२६ ६.१७ 
गोंदिया ८.१० ४.७० 
चंद्रपूर ७.५० ८.९९ 
गडचिरोली ४.२८ 
नाशिक ८.२१ 
धुळे ७.५० १३.०५ 
नंदूरबार ११.४० ११.८१ 
जळगाव १४.५० १२.६५
नगर ७.५० ९.९० 
पुणे ७.६० ९.०९
सोलापूर ६.५०. ७.९२ 
सातारा १० ९.३८ 
सांगली ६.२६ ७.८० 
कोल्हापूर ९.९५ ९.१६ 
रत्नागिरी ४.७८ ४.७८ 
रायगड ४.१८ ४.१८ 
पालघर ७.२८ ७.२८ 
ठाणे ७.०१ ७.०१ 

 


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...