Agriculture news in marathi; heft of one and a half lakh rupees onion at Taharabad | Agrowon

ताहाराबाद येथे दीड लाख रुपयांच्या कांद्याची चोरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नाशिक  : सटाणा तालुक्यातील अंतापूर येथील रावेर शिवारात रविवारी (ता. ३) रात्री मुस्ताक इसाक शेख यांच्या कांद्याच्या चाळीतून १ लाख ३० हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यामध्ये चोरीबाबत तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. 

नाशिक  : सटाणा तालुक्यातील अंतापूर येथील रावेर शिवारात रविवारी (ता. ३) रात्री मुस्ताक इसाक शेख यांच्या कांद्याच्या चाळीतून १ लाख ३० हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यामध्ये चोरीबाबत तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ताहाराबाद- अंतापूर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर.२३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. रविवार (ता. ३) रात्री अज्ञात चोरट्यांनी वाहन आणून सोबत ६२ कांदा गोणी पैकी चाळीस गोणी आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला आहे. सोमवार (ता. ४) रोजी सकाळी लुकमान शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी, कुलूप तोडलेली दिसले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी जायखेडा पोलिस स्टेशनची संपर्क साधून साहेब पोलिस निरीक्षक श्री. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एम. पवार यांनी मोहन महाजन, लुकमान शेख, अदनान शेख, भगवान माळी यांच्यासमक्ष पंचनामा केला.

याअगोदर अंतापूर- मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर. ३४७ मध्ये उभे असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पानपाटील यांच्या वीस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य, उत्पादने चोरी जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान व रात्री पहाटे होणाऱ्या चोऱ्या यांमुळे दुष्काळात तेरावा महिना उभा राहिला आहे.

चोऱ्याचा तपास करण्याची मागणी 
जायखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत मोसम-करंजाडी खोऱ्यातील ९२ गावे आहेत. पोलिस संख्याबळ कमी असल्याने अशा लहानमोठ्या गुन्ह्यांचे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने अधिक पोलिस बळ व गस्त वाढवून आत्तापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंतापूर येथील माजी उपसरपंच साहेबराव गवळी यांनी केली आहे. 


इतर बातम्या
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....