हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
वारस नोंदीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार
सोलापूर ः जिल्ह्यात रखडलेले वारसनोंदीचे काम कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम ठरवून पूर्ण करु. साधारण, येत्या ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जिल्हा तलाठी संघाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा तलाठी संघाची बैठक संघाचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथे झाली. या बैठकीमध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत न्यायालयीन प्रकरणे वगळून सर्व मयत खातेदारांच्या वारस नोंदी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघाचे तालुकाध्यक्ष, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.
एक मार्च ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत संबंधित गावच्या तलाठी कार्यालयात गाव नमुना नं ८ ‘अ’ चे वाचन करून मयत खातेदारांचा शोध घेऊन नोंदी केल्या जाणार आहेत. नागरिकांनी १ ते ५ मार्च २०२१ या कालावधीत तलाठी कार्यालयात मयत खातेदारांचा मृत्यू दाखला, वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र / कोर्टाचे वारस प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तलाठी संघाने केले.