बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही? ः राजू शेट्टी

केंद्र शासनाने बिहारमध्ये पूर आल्यावर तातडीने मदत केली. परंतु महाराष्ट्रात अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊन देखील अद्याप मदत जाहीर केली नाही. महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
Help to Bihar, then why not to Maharashtra? : Raju Shetty
Help to Bihar, then why not to Maharashtra? : Raju Shetty

मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये पूर आल्यावर तातडीने मदत केली. परंतु महाराष्ट्रात अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊन देखील अद्याप मदत जाहीर केली नाही. महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्ताने माजी खासदार शेट्टी सांगली जिल्ह्याचा दौरा करून पंढरपूर येथे जात असताना मंगळवेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम युवा आघाडीचे ॲड. राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, विजय रणदिवे, आबा खांडेकर, श्रीकांत पाटील, सचिन पाटील, श्रीमंत केदार, शंकर संघशेट्टी, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, की यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी व जनावरे वाहून गेली. द्राक्ष व डाळिंब बागांसह इतर फळ व धान्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे व इतर गोष्टी बाजूला ठेवून हेक्‍टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे. याशिवाय ओला दुष्काळ जाहीर करून राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्‍यकता आहे. पर्यावरणाची छेडछाड केल्याची शिक्षा देखील शेतकऱ्यांना भोगावी लागते. शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असताना पंतप्रधान ज्याप्रमाणे जगभर विमानाने पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जागतिक व्यासपीठावर मांडले पाहिजे, अशी भूमिका मांडून मी सत्तेत आहे किंवा नाही याच्याशी काही देणे घेणे नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com