योजनांच्या अंमलबजावणीसाठी भाजप आमदारांच्या मतदारसंघात मदत केंद्र

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई  : मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिक पातळीवर मदत करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षभरात राबवलेल्या योजनांची व त्यामुळे समाजाला कसा फायदा झाला याची माहिती आमदारांनी आपापल्या मतदारसंघात आक्रमकपणे मांडावी. त्याचबरोबर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक आमदाराने मतदारसंघात मदत केंद्र सुरू करावे, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत झाला.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्र्वभूमीवर सद्यःस्थितीबाबत भाजप आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील मुंबई भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या आमदारांची गुरुवारी बैठक घेतली.

या वेळी मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे मत सर्व भाजप आमदारांनी मांडले. त्याचबरोबर आपापल्या मतदारसंघांत आंदोलनाची काय परिस्थिती आहे याची माहिती आमदारांनी बैठकीत दिली. आंदोलकांमध्ये गट पडत असल्याने संवाद साधतानाही अडचण येत आहे. चर्चा करायची तर कोणाशी असा प्रश्न पडतो, याकडे काही आमदारांनी लक्ष वेधले.

त्याचबरोबर विरोधक सत्तेवर असताना मराठा समाजासाठी काहीच करू शकले नाहीत आणि आज समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते करत असलेली फसवणूकही लोकांच्या लक्षात आणून दिली पाहिजे, असेही मत या वेळी मांडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com