सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शिवसेनेची मदत केंद्रे सुरू
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शिवसेनेची मदत केंद्रे सुरू

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शिवसेनेची मदत केंद्रे सुरू

सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ठिकठिकाणी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट येथे  शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. वानकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शिवसेना अडचणीच्या काळात बळिराजाच्या पाठीशी आहे, असे नमूद करीत दिलासा दिला. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला काही दिवसांपूर्वी कोरड्या तर आता ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व नुकसान झालेल्या पिकांची सविस्तर नोंद शासनदरबारी जाऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता केंद्रे सुरू केली आहेत, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे सुरू आहेतच, परंतु माहिती कशी भरायची, कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या मदत केंद्रांचा उद्देश असल्याचे जिल्हाप्रमुख  वानकर यांनी सांगितले.   या वेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे, संजय माशिळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, तालुकाप्रमुख चरणराज चवरे, नगरसेविका सीमाताई पाटील, काका देशमुख, नगरसेवक सत्यवान देशमुख, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख, विकी देशमुख, नागेश व्हनकळसे, सोमेश क्षीरसागर, प्रशांत गाढवे, बिरुदेव वाघमोडे, लखन शिंदे, रणजित गायकवाड, सचिन जाधव आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com