agriculture news in marathi, help centers starts in district, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शिवसेनेची मदत केंद्रे सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ठिकठिकाणी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी सांगितले. 

सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ठिकठिकाणी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट येथे  शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. वानकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शिवसेना अडचणीच्या काळात बळिराजाच्या पाठीशी आहे, असे नमूद करीत दिलासा दिला. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला काही दिवसांपूर्वी कोरड्या तर आता ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व नुकसान झालेल्या पिकांची सविस्तर नोंद शासनदरबारी जाऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता केंद्रे सुरू केली आहेत, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे सुरू आहेतच, परंतु माहिती कशी भरायची, कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या मदत केंद्रांचा उद्देश असल्याचे जिल्हाप्रमुख  वानकर यांनी सांगितले. 
 या वेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे, संजय माशिळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, तालुकाप्रमुख चरणराज चवरे, नगरसेविका सीमाताई पाटील, काका देशमुख, नगरसेवक सत्यवान देशमुख, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख, विकी देशमुख, नागेश व्हनकळसे, सोमेश क्षीरसागर, प्रशांत गाढवे, बिरुदेव वाघमोडे, लखन शिंदे, रणजित गायकवाड, सचिन जाधव आदी उपस्थित होते. 


इतर बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के...नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने...