तज्ज्ञांच्या मदतीने ऊस उत्पादनात वाढ होईल

तज्ज्ञांच्या मदतीने ऊस उत्पादनात वाढ होईल
तज्ज्ञांच्या मदतीने ऊस उत्पादनात वाढ होईल

कोल्हापूर : ऊसशेती करताना कृषी विद्यापीठे, विविध तज्ज्ञ, कृषी विभागाची सातत्याने मदत घ्या, असे झाल्यास ऊस उत्पादनात दुप्पट फरक पडेल. फक्त कष्ट करायची तयारी ठेवा, असा सल्ला प्रगतिशील शेतकरी विश्‍वनाथ पाटील (अंबपकर) यांनी खेबवडे (ता. करवीर) येथे दिला. दैनिक ‘सकाळ ॲग्रोवन’ व महाधनच्या वतीने खेबवडे येथील विठ्ठल मंदिरात ऊसविषयक चर्चासत्र झाले. त्या वेळी ते बोलत होते. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील अध्यक्षस्थानी होते.

श्री. पाटील यांनी केवळ तांत्रिक माहिती न देता प्रत्येक बाबींची व्यवहाराशी सांगड घालून शेतीत सुधारणा करायच्या पद्धती सांगितल्या. शेतकरी वापरत असलेली पारंपरिक पद्धत बदलण्याची गरज असल्याचे सांगून आज कृषी विद्यापीठे, विविध ऊस तज्ज्ञ नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत आहे. पण आमचा शेतकरी पारंपरिकतेच्या फेऱ्यातच अडकला आहे. अनेकदा चुकीच्या गृहीतकावर शेती केली जाते. ही शेती करताना उसाच्या प्रत्येक बाबींचे सूक्ष्म निरीक्षण हवे. आपल्याला येणाऱ्या अनुभवाबद्दल तज्ज्ञांशी बोलणे. तांत्रिक बाबीबरोबर आलेले अनुभवही प्रखरतेने मांडून शेतीतले प्रश्‍न सोडवले पाहिजेत.

शेतकऱ्यांनी शंभर टक्के लक्ष घालून कष्टपूर्वक लक्ष दिल्यास शेती फायदेशीर होऊ शकते. यावेळी ऊस लावणी ते काढणीपर्यंतच्या टप्प्याची माहिती, ऊस शेती करताना आलेले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. महाधनचे विभागीय विपनन व्यवस्थापक पंकज गोंजारी यांनी महाधनच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. विजय पाटील, सुभाष पाटील, जयप्रकाश पाटील, बी. डी. चौगले,‘सकाळ’चे बातमीदार पंडीत कोईंगडे आदि उपस्थित होते. ‘ॲग्रोवन’चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांनी स्वागत केले. ॲग्रोवनचे सीनियर एक्‍झिक्‍युटिव्ह विशाल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संपत पाटील यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com