Agriculture news in Marathi Help group compared to expenses: Raghunath Patil | Agrowon

खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र, दिलेल्या मदतीतून शेतीची मशागत देखील होणार नाही. मदत देऊन शासनाने केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी रविवारी (ता. २५) आयोजित पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी, पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीबाबत भरपाईसाठी नुकतीच घोषणा केली आहे. परंतु ही भरपाई खर्चाच्या तुलनेत तोकडी आहे. शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र, दिलेल्या मदतीतून शेतीची मशागत देखील होणार नाही. मदत देऊन शासनाने केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी रविवारी (ता. २५) आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. २३) राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई देण्यासाठी दहा हजार कोटींची घोषणा केली. यात जिरायती व बागायती पिकांसाठी हेक्टरी दहा हजार तर फळपिकांसाठी पंचवीस हजार रुपये भरपाई दोन हेक्टरपर्यंत देण्याचे सांगितले. खर्चाच्या तुलनेत भरपाई खूप कमी आहे. या भरपाईतून फक्त शेतीची मशागत होऊ शकते. दुबार पेरणी, खते, बी-बियाणे शेतकरी कसे घेणार? फळबागांचे नुकसान कसे भरून निघणार? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा आहे.

शेतीपिकाला योग्य हमीभाभाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने शेतकरी संघटनेतर्फे संपूर्ण राज्याचा दौरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी पुढील आठवड्यात मराठवाड्याचा दौरा करण्यात येणार आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी कायद्यात तरतूद आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या घटना घडतात. या प्रश्‍नाबाबत सर्व अधिकारी, मंत्री, आमदार, खासदारांना जाब विचारणार आहे. पुढील महिन्यात याबाबत औरंगाबादमध्ये मोठी परिषद घेऊन शेतकरी प्रश्‍नावर आवाज उठवणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, ॲड. अजित काळे, शिवाजी नांदखिले, विनायक जाधव यांची उपस्थिती होती.

 


इतर ताज्या घडामोडी
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने ६३८५ क्‍...औरंगाबाद : ‘‘किमान आधारभूत किमतीने ६३८५ क्‍...
परतूर तालुक्‍यातील द्राक्ष, डाळिंब...जालना  : परतूर तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष...
खानदेशात गहू पेरणीचा वेग मंदावलाजळगाव : खानदेशात गेली आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण...