पोल्ट्री उद्योगाला मदत करा

poultry
poultry

नगर: कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे नगर जिल्ह्यातील चिकन व अंडी उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतीपूरक हा व्यवसाय टिकून राहावा यासाठी शासनाने कोंबड्याचे तातडीने पंचनामे करून २०० ते २५० रुपये पर्यंतची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगर जिल्हा पोल्ट्री फेडरेशनतर्फे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांच्याकडे केली आहे.  जिल्हा पोल्ट्री फेडरेशनचे बाबासाहेब हारदे, अभिषेक खंडागळे, सचिन भोंगळ, डॉ.महेश उड्डे, उमेश बनकर, विजय लांडे, सचिन मुचगुले, राजेंद्र वर्पे, शिवाजी शिंगोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, चिकन व अंडी खाल्ल्यामुळे कोरोना होतो या चुकीच्या अफवेमुळे नगर जिल्ह्यासह राज्यात कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस या व्यवसायातील मंदीमुळे विक्रीचे भाव दररोज खाली येत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे.  पोल्ट्री व्यावसायिकांना एक किलो चिकन तयार करण्यासाठी ८० ते ९० रुपये खर्च येत आहेत व सध्याचे बाजार भाव २० ते २५ रुपये आहेत. अंड्यांचे भाव कमी झाले असून अंडी उत्पादन करण्यासाठी येणारा खर्चदेखील भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्मचे ८ दिवसांमध्ये तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी. या वेळी सय्यद अली, बाळासाहेब लहाने, अरुण शेटे, मधुकर काळे, सोमनाथ तनपुरे, मच्छिंद्र कोकणे, भिमराव मोरे, अमोल चव्हाण, संदीप कोकणे, सुनील तनपुरे, रत्नदीप कांबळे, शकील शेख, किशोर पवार, जीवन वाघ, सुनील कुदळ आदींसह पोल्ट्री फार्म व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन दिले.    अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा  कोरोना व्हायरसचा आणि चिकन, अंड्याचा काहीही संबंध नसल्याबाबत पशुसंवर्धन विभाग, शासनाने अनेक वेळा जाहीर करूनही खोटे व दिशाभूल करणारे मेसेज सुरुच आहेत. त्यामुळे अशा लोकांवर लक्ष ठेवून चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com