‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा स्वच्छतेची कामे युद्ध पातळीवर'

‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा स्वच्छतेची कामे युद्ध पातळीवर'
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा स्वच्छतेची कामे युद्ध पातळीवर'

सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत, धान्य पुरवठा, विद्युत पुरवठा, पंचनामे, दुरुस्ती, खासगी संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीचे युद्धपातळीवर नियोजन सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १६) दिली. पूरग्रस्तांसाठी आलेल्या बचाओ कार्यातील जनावांची शेवटची तुकडीही प्रशासनाने परत पाठवली. ९१० शेती पाणी संस्थापैकी ९०२ योजना पुन्हा सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 

सांगली महापालिकेसह ग्रामीण भागातील १०४ गावातील सुमारे ८७ हजार १२९ कुटुंबातील सर्वसाधारण ३ लाख ११ हजार लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. महापुरात २६ जण मृत्युमुखी पडले, तर एक जण बेपत्ता झाला. पंचनामे सुरू झाले असून गुरुवार (ता. १५) पर्यंत १४ हजार ५०० कुटुंबांना ७.२१ कोटी रुपयांचे वाटप झाले.

मयत २०१ गाय-म्हैशीचे पंचनामे झाले. शेळ्या-मेंढ्या ६४ मेल्या. उंट, घोडा, बैल-तीन मयत झाले. वासरू आणि लहान ७८ जनावरे दगावली. आतापर्यंत ४३३ घरे पूर्ण, तर २९९७ घरे अशतः पडली, असे चौधरी यांनी सांगितले. जिल्ह्यात मदतीसाठी आलेल्या जवानांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २३७ पथके (शहर-१०३, ग्रामीण- १३४) काम करीत आहेत. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि रॉकेलचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत २९० क्विंटल गहू, तांदळाचे वाटप झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबापर्यंत ३० वस्तूंचे एक कीट देणार आहे. सध्या मदतीचा ओघही चांगला आहे, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन... 

धोकादायक घरात राहू नका, मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, गावात मिळणारी मदतीचेही ग्रामपंचायतीने वाटप करावे, शहरातील कचरा उठावसाठी मोहीम गतीने सुरू आहे. डॉक्‍टरांच्या मदतीशिवाय परस्पर औषधे वाटू नका, नियमित शाळा सुरू होतील. शाळांत राहणाऱ्या कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतरण होईल. गरजूंना पुन्हा मोफत पुस्तके मिळणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com