मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ. कदम

परभणी : ‘‘मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल’’ असे प्रतिपादन कृषी, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
  Help soon on farmers' accounts: Dr. Kadam
Help soon on farmers' accounts: Dr. Kadam

परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोरोना साथीमुळे आर्थिक चणचण असताना देखील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यात आली. ती  एनडीआरएफच्या निकषापेत्रक्षा अधिक आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल’’ असे प्रतिपादन कृषी, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत  कदम यांनी केले.

कदम यांनी गुरुवारी (ता.२९) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला. आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे आदी उपस्थित होते. 

कदम म्हणाले, ‘‘राज्य शासनाने आर्थिक चणचण असतानाही १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. परतीच्या पावसाने व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना जास्त मदत मिळेल. यासाठी अधिकाऱ्यांनी प्राधान्याने व्यवस्थित पंचनामे करावे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९७ टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला.’’ 

‘‘हमीभावाने कापूस खरेदीबाबत लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. केंद्र सरकार बिहारला मदत करत आहे. परंतु, महाराष्ट्राला मदत करण्यासाठी आडकाठी आणत आहे. केंद्र सरकार दुजाभाव करत असताना राज्य सरकारने नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना मदत जाहीर करून मोठा आधार दिला, असे कदम यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com