वस्त्रोद्योगाला मदत करा; शेट्टींचे जेटलींना साकडे

वस्त्रोद्योगाला मदत करा; शेट्टींचे जेटलींना साकडे
वस्त्रोद्योगाला मदत करा; शेट्टींचे जेटलींना साकडे

नवी दिल्ली : वस्त्रोद्योग व्यवसाय मंदीच्या गर्तेत सापडला आहे. टफ योजनेचे अनुदान पूर्ववत करून वस्त्रोद्योग व्यवसायाला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. तसेच, यार्न बॅंकेमार्फत येणाऱ्या सवलत योजनेमध्ये वाढ करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी केली आहे. वस्त्रोद्योग व्यवसायातील अडचणीसंदर्भात खासदार शेट्टी यांनी मंत्रालयात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी श्री. जेटली यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, की टफ योजनेमुळे संपूर्ण भारतातील वस्त्रोद्योगात प्रचंड विकास आहे. ही योजना गेल्या १५ वर्षांपासून अतिशय सुलभतेने अमलात आणली गेली आहे. आरआर-टीयूएफएस योजनेंतर्गत पॉवरलूम उद्योजकांना ३०% भांडवली सबसिडी होते. पण, १३ जानेवारी २०१६ रोजी भांडवल अनुदान करून फक्त १०% केले आहे. यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायावर संक्रांत आलेली आहे. मंदीच्या गर्तेत व्यवसाय सापडला असून, वस्त्रोद्योग व्यवसाय कोलमोडून जाण्याच्या मार्गावर आहे.  या व्यवसायाला तारण्यासाठी  १०% सबसिडी फारच अपुरी आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की गेल्या १ ते २ वर्षांपासून उद्योजकांच्या शेड्यूल्डची बॅंक परतफेड योजना विस्कळीत झाल्याने सबसिडी रक्कम मिळविण्यात विलंब होतो. शटललेस उद्योग व्यवसायासाठी  मोठी भांडवली पैशांची आवश्‍यकता आहे. उद्योजक स्वत: मोठी रक्कम वाढवू शकत नाहीत.  प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी बॅंक कर्ज घेणे आवश्‍यक आहे. प्रकल्पाचे आर्थिक पैलू विचारात घेत असताना एसएसआयसाठी टफ सबसिडी वाढविणे आवश्‍यक आहे. यार्न बॅंक योजनेमध्ये प्रणाली बदलणे आवश्‍यक आहे. सध्या या योजनेत बॅंक हमी आवश्‍यक आहे, परंतु बॅंकर्स कोणत्याही ठेवीशिवाय बॅंक गॅरंटी देत नाही. उद्योजकांसाठी ही मोठी समस्या आहे. तर, बॅंक हमीची अट मागे घेण्यात यावी. यार्न बॅंक योजनेमध्ये सध्या धागा ५०: ५०% या गुणोत्तर प्रमाणात पुरवतो. हा गुणोत्तर २५: ७५% गुणोत्तर (वापरकर्ता २५% आणि शासनाद्वारे ७५%) मध्ये करणे आवश्‍यक आहे. तरच वस्त्रोद्योग व्यवसायाला मंदीच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.  केंद्र सरकारने त्वरित तातडीने ठोस पावले उचलावीत. तसेच यंत्रमागधारक पूर्णपणे तोट्यात आहेत. आर्थिक मंदीमुळे या धंद्यावर मोठी संक्रांत आली आहे. जर, उद्योग तारायचा असेल, तर यासाठी सरकारने तातडीने यंत्रमागधारकांना पॅकेज द्यावे, तसेच याची तरतूद येणा-या अर्थसंकल्पात केली जावी, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली.  श्री  जेटली म्हणाले, "या प्रश्नांसाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, या व्यवसायाला योग्य ती मदत करू", अशी ग्वाही दिली. या वेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com