समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान झालेल्यांना मदत

कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांची धुळीमुळे नासाडी झाली होती. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, संबंधितांनी दखल न घेतल्याने शिवसेनेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
Help those affected by the dust of the Samrudhi Highway

समृद्धी महामार्गाच्या पॅकेज चारचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कामामुळे या महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना व रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता. या रस्त्याच्या कामामुळे धूळ तयार होऊन पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत अनेक तक्रारी महामार्गाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व गावात राहणाऱ्या रहिवाशांनी सदर कंपनीकडे केल्या. परंतु, कंपनीने सुरुवातीला या सर्व तक्रारींकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपले काम चालू ठेवले. मात्र, या कामाचा त्रास वाढल्याने सदरहू शेतकऱ्यांनी माजी आमदार प्रकाश डहाके व खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे तक्रारी केल्या.

या तक्रारींची दखल घेऊन कंपनीच्या यार्ड समोर शिवसेनेने ठिय्या आंदोलन केले. याची दखल सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांना तातडीने बैठकीचे निर्देश दिले. त्यानुसार खासदार भावनाताई गवळी, शिवसेना तालुका प्रमुख विष्णू तिडके, शहर प्रमुख गणेश बाबरे, उपतालुका प्रमुख विलास सुरळकर, शंभू जिचकार, गोपाल येवतकर व नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या दरम्यान बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.

यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. पहिल्या यादीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रकाश डहाके व विष्णू तिडके यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी आंदोलनात सहभाग घेणारे गणेश बाबरे, विलास सुरळकर, शंभू जिचकार, गोपाल पाटील येवतकर, नगरसेवक प्रसन्न पळसकर, नितीन गढवाले, अक्षय लोटे, अतुल दरेकर, नीलेश टेकाडे, विजय जाधव आदी उपस्थितीत होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com