द्राक्षबागांना एकरी अडीच लाखांची मदत द्या ः ‘स्वाभिमानी’ची मागणी

नाशिक : संपूर्ण देशात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यासह द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे. व्यापारी मिळत नसल्यामुळे द्राक्ष बागांवरील द्राक्ष काढणीविना आहेत. त्यामुळे ज्या द्राक्ष उत्पादकांना खुडा झालेला नाही किंवा विकलेल्या व लॉकडाऊननंतर बेभाव विकलेल्या द्राक्ष बागायतदारांना एकरी किमान अडीच लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
Help the vineyards for one and a half lakhs: Demand for self-respect

दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मुख्यमंत्री व संपूर्ण शासन यंत्रणा जीव तोडून काम करत आहे. परंतु द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जर वेलींवर कुऱ्हाड चालवली तर केवळ शेतकरी नाही तर त्यावर वर्षभर काम करणारे मजूर व अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होणार आहेत. काहींनी द्राक्ष तोडून वाळत घातले तर काही शेतकरी द्राक्षांसह वेलींवर कुऱ्हाड चालवत आहेत. म्हणून द्राक्ष पिकांकडे फक्त शेतीपीक म्हणून न पाहता ‘इंडस्ट्री’ म्हणून पाहावे. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकिंग व्यवस्था अडचणीत येईल. द्राक्ष पिकाच्या माध्यमातून परकीय चलन मिळते, यासाठी सरकारने मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती अडचणीची असल्याने राज्याची सगळी आर्थिक परिस्थिती पाहून मदत दोन टप्प्यात दिली. तरी आम्ही समाधानी राहू, अशी समंजस भूमिका ही संघटनेकडून घेतलेली पाहायला मिळत आहे. 

आज शासन ‘कोरोना’सारख्या जागतिक आपत्तीशी संघर्ष करत आहे, हे सत्य आहे. त्यामुळे मदत मागण्यांची ही वेळ नाही. पण आता द्राक्ष उत्पादकांचे दुःख आता बघवत नाही. म्हणून जड अंतःकरणाने हे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहलंय. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वतः द्राक्ष उत्पादकांचे दुःख मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे. आमच्या मागणीचा ते विचार करतील, अशी नम्र अपेक्षा आहे.  - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com