नंदुरबारात बोंड अळीच्या मदतीचे साडेपाच कोटी वाटपाविना पडून

नंदुरबारात बोंड अळीच्या मदतीचे  साडेपाच कोटी वाटपाविना पडून
नंदुरबारात बोंड अळीच्या मदतीचे साडेपाच कोटी वाटपाविना पडून

नंदुरबार : जिल्ह्यातील ८५ हजार ८९५ शेतकऱ्यांना बोंड अळीच्या नुकसानीपोटी ८९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ८० हजार २७६ शेतकऱ्यांना ८४ कोटी २२ लाख रुपयांची निधी वाटप करण्यात आला. अर्थातच सुमारे साडेपाच कोटी रुपये वाटपाविना पडून असून, संबंधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

मागील वर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर केला. शेतकऱ्यांना वितरित केलेल्या निधीबाबत उर्वरित शेतकऱ्यांना बोंड अळीचे पैसे देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी तातडीची बैठक बोलविली. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, नंदुरबार, शहादा व तळोदा तहसीलदार उपस्थित होते.

उर्वरित निधी वाटपासाठी शेतकऱ्यांचे खाते क्रमांक घेण्यात आले असून त्यात लवकरच बोंड अळीचा निधी जमा केला जाईल. निधीच्या कमतरतेमुळे नंदुरबार, तळोदा तहसीलदारांनी अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. त्यानुसार ४ कोटी ८५ लाख रुपयांचा अतिरिक्त निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com