तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात 

ढवळपुरीकरांनी तमाशा कलावंतांसाठी पुढाकार घेतला आणि ५१ हजारांची आर्थिक मदत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केली.
Helping hands for Tamasha artists
Helping hands for Tamasha artists

नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी झाली आहे. त्यामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. ढवळपुरी गावाला तमाशा कलवंतांचा वारसा आहे. ज्यांच्या कलागुणांमुळे गावाची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली, तो समाज टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत आला आहे. त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याने, ढवळपुरीकरांनी तमाशा कलावंतांसाठी पुढाकार घेतला आणि ५१ हजारांची आर्थिक मदत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केली. या वेळी सरपंच राजेश भनगडे, भागाजी गावडे, सुखदेव चितळकर, बंडू जाधव, हिरामण भालेराव, अजित सांगळे, अहमद पटेल या वेळी उपस्थित होते. राज्यातील असा पहिलाच उपक्रम आहे. 

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे यांनी एका मुलाखतीत, टाळेबंदीमुळे तमाशा कलावंतांचे अतोनात हाल सुरू असून, त्यांना मदतीची गरज असल्याचे बोलून दाखविले होते. ढवळपुरीतील चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा फार पूर्वीपासून तमाशाचा फड आहे. राज्यात नावाजलेला हा फड असल्याने, गावालाही त्यांचा अभिमान आहे. आता त्यांची मुले किरण व संतोष ढवळपुरीकर हा वारसा पुढे नेत आहेत. या कलावंतांच्या अडचणीच्या यातना या गावालाही झाल्या. सरपंच राजेश भनगडे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीसाठी ग्रामस्थांना आवाहन केले. गावकऱ्यांनीही साथ देत तब्बल ५१ हजार रुपये जमा केले. ही रक्कम रघुवीर खेडकर यांच्याकडे देण्यात आली. खेडकर यांनी गावाचे आभार मानत, ‘‘माणुसकी जिवंत आहे. समाजातील सर्व घटकांसोबत आम्हा कलावंतांनाही टाळेबंदीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही मदत कलावंतांसाठी निश्‍चित मोलाची ठरेल,’’ असे सांगितले. 

ज्या कलावंतांनी आयुष्यभर आपल्याला हसविण्याचे, तसेच आपली करमणूक करण्याचे काम केले, त्यांच्या डोळ्यांत आज पाणी असताना आपण त्यांना आधार देणे महत्त्वाचे आहे. हा विचार करून मदत केली आहे.  - राजेश भनगडे, सरपंच 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com