agriculture news in Marathi, Hemant Godse repeat at Nashik, then Dr. Bharti Pawar's first woman MP | Agrowon

नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती पवार पहिल्या महिला खासदार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार व पक्षांसाठी ही यंदाची निवडणूक अटीतटीची होती. मात्र महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार यांनी विक्रमी विजय संपादन केला आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे हे पुन्हा रिपीट झाले, तर दिंडोरीमधून भाजपने चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी लाटेचा प्रभाव जिल्ह्यात दिसून आला.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार व पक्षांसाठी ही यंदाची निवडणूक अटीतटीची होती. मात्र महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार यांनी विक्रमी विजय संपादन केला आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे हे पुन्हा रिपीट झाले, तर दिंडोरीमधून भाजपने चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी लाटेचा प्रभाव जिल्ह्यात दिसून आला.

अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे व दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या उपस्थितीत सर्व व्यवस्था पोलिस यंत्रणेसह काटेकोरपणे ठेवण्यात आली होती. नाशिकच्या २७ तर दिंडोरीच्या २५ मतमोजणीच्या फेऱ्या पार पडल्या;  मात्र कामकाज संथ गतीने झाले.

नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत शेतकऱ्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता होती. कांदा, द्राक्ष यांच्या भावासह ड्रायपोर्ट व कृषी टर्मिनलची झालेली घोषणा, शेतीसिंचन व बुडीत निघालेला सहकार याचा परिणाम निवडणुकीत होणार अशी चर्चा होती. ग्रामीण भागात मोदी सरकारबद्दल नाराजीचा सुरू बघायला मिळाला होता. केंद्राच्या ‘शेतकरी सन्मान योजना'' व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता असताना ग्रामीण भागातील जनतेने महायुतीला कौल दिला असल्याचे या निकालात स्पष्ट झाले आहे.

पहिल्या फेरीपासूनच हेमंत गोडसे यांनी आघाडी घेतली होती. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ गोडसेंचा विजयी वारू रोखतील अशी अनेकांना खात्री होती. मात्र निकालाचे चित्र वेगळेच पाहायला मिळाले. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या उमेदवारीने नेमकी कुणाला बाधा ठरेल असे बोलले जात होते. दोघांनीही लाखांहून अधिक मते मिळविली. मात्र हेमंत गोडसे यांनी विजयी शिक्कामोर्तब केले. तसेच दिंडोरीमध्ये डॉ. भारती पवार यांनीही पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांना आपल्या पारड्यात भुजबळ पिता पुत्रांचे वजन पडेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. माकपचे उमेदवार व विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांचाही करिश्मा म्हणावा तसा दिसून आला नाही. त्यामुळे दोन्हीही लोकसभा मतदारसंघात महायुतीने २०१४ ची यशस्वी पुनरावृत्ती केली आहे.

दोघांनीही मोडले विक्रम
नाशिक लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भानुदास कवडे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा म्हणून निवडून येणारे खासदार म्हणून हेमंत गोडसे हे एकमेव उमेदवार आहेत, त्यामुळे ‘रिपीट’ होण्याचा यांनी बहुमान मिळविला आहे, तर नाशिक जिल्ह्यात पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान भाजपच्या डॉ. भारती पवार यांना मिळाला आहे.

उमेदवारांना मिळालेली एकूण मते
नाशिक लोकसभा मतदारसंघ

हेमंत गोडसे विजयी (शिवसेना)  ५,६३,५९९
समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)  २,७१,३९५
माणिकराव कोकाटे (अपक्ष) १,३४, ५२७
मताधिक्याने विजय   २,९२,२०४

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

डॉ. भारती पवार (भाजप) ५,६७,४७०
धनराज महाले (राष्ट्रवादी काँग्रेस) ३,६८,६९१
जीवा पांडू गावित (माकप) १,०९, ५७०
बापू बर्डे (वंचित बहुजन आघाडी) ५७,०४८
मताधिक्याने विजय १,९८,७७९

 

मला मतदारांनी पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या कामासाठी झटल्याचे चीज झाले.
- हेमंत गोडसे, शिवसेना विजयी उमेदवार

 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून माझ्यावर नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार, आता जबाबदारी वाढली आहे. आता मतदारसंघातील समस्या सोडविण्यास प्रयत्नशील राहणार.
- डॉ. भारती पवार, भाजप विजयी उमेदवार

इतर बातम्या
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...