'कोंबडी आणि चिकनचे दर निश्‍चित करण्याचे प्रयत्न'

पशुसंवर्धन विभागाच्या पुढाकाराने रेडीरेकनरच्या धर्तीवरकोंबडी आणि चिकनचे दर निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली.
'कोंबडी आणि चिकनचे दर निश्‍चित करण्याचे प्रयत्न'
'कोंबडी आणि चिकनचे दर निश्‍चित करण्याचे प्रयत्न'

कोल्हापूर : बर्ड फ्लूची भीती दाखवून सध्या पोल्ट्रीधारकांकडून कमी किमतीने कोंबड्या घेऊन त्याचे चिकन जादा दरात ग्राहकांना विकण्यचे प्रकार सुरू आहेत. याचा तोटा दोघांनाही होत आहे. हे टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या पुढाकाराने रेडीरेकनरच्या धर्तीवर दर निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली.

बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पोल्ट्रीधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या दरनिश्‍चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचीही मदत घेणार असल्याचे डॉ. पठाण यांनी स्पष्ट केले. ते म्हणले, की सध्या या रोगामुळे पोल्ट्री उद्योगात गोंधळाचे वातावरण आहे. याचा फायदा व्यापारी वृती घेत आहे. नाममात्र दरात कोंबडी खरेदी करत नफा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या धर्तीवर कोंबडी व चिकनचे दर निश्‍चित करण्याकडे वळत आहोत. याबाबत नेमके काय करता येईल याबाबत आम्ही नियमावली करत आहोत. लवकरच याबाबतची मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जिल्ह्यातील साडेपाचशेवर कोंबड्यांची स्वॅब तपासणी केली. त्यातील एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. वरील सर्व पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यातील पोल्ट्री तसेच चिकन विक्रेत्यांना खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे सध्या तरी बर्ड फ्लूचा धोका दिसत नाही. त्यामुळे चिकन, अंडी खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र खबरदारीसाठी चिकन, अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत, असे आवाहन डॉ. पठाण यांनी यावेळी केले. अंडी उबवणी केंद्राचे उपायुक्त सुभाष नाईक, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ. सॅम लुड्रिक्‍स उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com