Agriculture news in Marathi A herd of cows in the Mungala area | Agrowon

मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

मूग, उडदाच्या झाडांवर शेंगा लागल्या असून रानडुकरे आता या पिकांचे अतोनात नुकसान करू लागले आहेत. याकडे तातडीने वनविभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या भागातील खरीप पिके जोमाने बहरली आहेत. मूग, उडदाच्या झाडांवर शेंगा लागल्या असून रानडुकरे आता या पिकांचे अतोनात नुकसान करू लागले आहेत. याकडे तातडीने वनविभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पेरणी केली. काही शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. आता या शेतशिवारात मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी अशी सर्वच पिके कमी अधिक प्रमाणात वाढू लागली आहेत. मात्र, वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांसमोर रानटी जनावरांचे मोठे संकट तयार झालेले आहे.

मुंगळा परिसरातील शेतीला लागून तीन बाजूंना जंगल आहे. या जंगलामध्ये अनेक रानडुक्कर, रोही, हरीण, माकड हे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. हे प्राणी शेतातील पिकांची दरवर्षी नासाडी करतात. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनेकवेळा महसूल अधिकारी, वन विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु अद्यापपर्यंत संबंधित विभागाने कुठलीही कारवाई केली नाही.

शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री पिकाची राखण करावी लागते.  यंदाही हा त्रास सुरू झाला. दोन दिवसांपूर्वी येथील भगवान सोनुने यांच्या मूग, उडीद पिकात रानडुक्करांनी नासधूस केली. शेंगा खाऊन पिकाचे नुकसान केले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुंगळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...