agriculture news in marathi, High alert for extreme weather conditions in North India | Agrowon

उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या दुथडी भरून

वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंडमध्ये पाऊस व पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४ झाली असून, या राज्यांत अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

यमुना व अन्य नद्या दुथडी भरून वाहत असल्याने दिली, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात पुराचा इशारा दिला आहे. यमुनेवरील हाथिनी कुंड धरणातून ८.२८ लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने हरियाना सरकारने लष्कराला तयारीत राहण्याची सूचना दिली आहे. 

नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंडमध्ये पाऊस व पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४ झाली असून, या राज्यांत अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

यमुना व अन्य नद्या दुथडी भरून वाहत असल्याने दिली, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात पुराचा इशारा दिला आहे. यमुनेवरील हाथिनी कुंड धरणातून ८.२८ लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने हरियाना सरकारने लष्कराला तयारीत राहण्याची सूचना दिली आहे. 

पावसामुळे हिमाचल प्रदेशात आतार्पंयत दोन नेपाळी नागरिकांसह २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४३ झाली असल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज दिली. उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण बेपत्ता आहेत. पंजाबमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे.

दिल्लीत खबरदारी
हरियानातील हथिनी धरणातून यमुनेत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले असल्याने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना दिल्ली प्रशासनाने उभारलेल्या निवारा केंद्रात आश्रय घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. यमुनेची पाणी पातळी सकाळी २०४.८ मीटरपर्यंत पोचली होती. २०१८ मध्ये ही पातळी २०६.०५ मीटर होती. १९७८ मध्ये यमुना नदीचे पाणी २०७.४ मीटरवरून वाहत होते. 

बंगालमध्ये सुधारणा; ओडिशात पावसाचा इशारा
कोलकाता ः पश्‍चिम बंगालमधील कोलकात्यासह अन्य भागात पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीत सुधारणा होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथे मुसळधार पाऊस पडून अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. पश्‍चिम बंगालचे शेजारील ओडिशात पुराचा धोका मागे घेतला आहे. मात्र पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दिल्ली

 •   २१२० निवारा केंद्रे उभारली आहेत.
 •   २३ हजार ८०० नागरिकांचा आश्रय
 •   यमुनेवरील 'लोहा पूल' बंद

हिमाचल प्रदेश

 •   भूस्खलनामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला
 •   शेकडो पर्यटक व स्थानिक अडकले
 •   रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळित
 •   सिमला, सोलन, कुल्लू, बिलासपूर जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये बंद
 •   हमीरपूर जिल्ह्यात वाहून गेलेल्या दोन शिक्षक व एका विद्यार्थ्याची सुटका
 •   साई राम महाविद्यालयाची इमारत कोसळली

उत्तराखंड

 •   ढगफुटीत नऊ जणांचा मृत्यू, २२ बेपत्ता
 •   उत्तर काशी जिल्ह्यातील मोरी भागात अनेक गावांत पूर; घरे वाहून गेली
 •   डेहराडून जिल्ह्यात मोटार नदीत पडून एक महिला वाहून गेली

उत्तर प्रदेश

 •   गंगा, यमुना, घागरा या नद्या दुथडी
 •   बदॉंऊ, गरमुक्तेश्‍वर, फरुखाबाद येथे गंगेने धोक्‍याची पातळी ओलांडली
 •   शारदा, घागरा नद्यांनी पूररेषा ओलंडली
 •   गंगा, यमुना काठावरील घरे पाण्याखाली

पंजाब

 •   राज्यातील काही भागांत पूरस्थिती
 •   काही रेल्वे गाड्या रद्द तर काही दुसऱ्या मार्गाने वळविल्या
 •   सतलज नदीजवळील भागात दक्षता

केरळ, कर्नाटकमधील बळींची संख्या १९७
बंगळूर/वायनाड ः
कर्नाटकमध्ये आलेले पुरातील बळींची संख्या ७६ वर पोचली आहे, तर दहा जण बेपत्ता आहेत. केरळमधील बळींची संख्या १२१ झाली आहे. वायनाड जिल्ह्यात दरडी कोसळल्याच्या घटनांमधील मृतदेह अजून सापडत आहेत. केरळमधील मल्लपुरममधील कवलपारा आणि वायनाड जिल्ह्यातील पुथुमला येथील दरडीखालील मृतदेहांचा शोध घेण्यासाठी जमीन भेदक रडारचा वापर केला जात आहे. कर्नाटकमध्ये ५०० निवारा केंद्र अजूनही सुरू असून दोन लाख नागरिकांना निवारा अन्न व पाणी पुरविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तमिळनाडूसह शेजारील राज्यांत पुढील दोन दिवसांत मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

केरळमधील मदत :

 • २९६ : निवारा केंद्र सुरू
 • ४७, ००० : निवारा केंद्रातील नागरिक

इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...