मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज अतिदक्षतेचा इशारा

मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३)सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळीच पाणी साचण्यास सुरुवात झाली; मात्र लॉकडाऊन असल्याने प्रवाशांची दरवर्षीप्रमाणे दैना झाली नाही.
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज अतिदक्षतेचा इशारा
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज अतिदक्षतेचा इशारा

मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३) सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळीच पाणी साचण्यास सुरुवात झाली; मात्र लॉकडाऊन असल्याने प्रवाशांची दरवर्षीप्रमाणे दैना झाली नाही.      दरम्यान, या पावसाने पुन्हा मुंबईतील नालेसफाईची पोलखोल केल्याचे आरोप होत असून, रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १६०.६ मि.मी. आणि सांताक्रूझ येथे १०२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. महामुंबईत शनिवारी २०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला असून, रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईत विशेषत: कुलाबा-फोर्ट परिसरात शुक्रवारी तुफान पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातही पाणी साचले होते. महालक्ष्मी, मलबार हिल येथील भुलाभाई देसाई मार्गावरही काही ठिकाणी पाणी साचले होते. भायखळा येथे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली. भायखळा पोलिस ठाण्याच्या परिसरातही पाणी साचले होते. चिरा बाजार, वरळी नाक्‍याचा भागही पाण्याखाली गेला होता. नेहमीप्रमाणे हिंदमाता, किंग्ज सर्कल हा भागही जलमय झाला होता. पश्‍चिम उपनगरात अंधेरी परिसरात सर्वाधिक ११८ मि.मी. पावसाची नोंद झाली. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली होती. घाटकोपर रेल्वेस्थानकाच्या परिसरातही पाणी साचले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडू लागले असून, महापालिकेकडे तक्रारी येत आहेत. सकाळपासून काही भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले; तर काही ठिकाणी रेल्वेमार्गाच्या परिसरातही पाणी साचल्याचे दृश्‍य होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com