agriculture news in marathi high alert for rain in state capital Mumbai | Agrowon

मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज अतिदक्षतेचा इशारा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३) सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळीच पाणी साचण्यास सुरुवात झाली; मात्र लॉकडाऊन असल्याने प्रवाशांची दरवर्षीप्रमाणे दैना झाली नाही.

मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३) सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळीच पाणी साचण्यास सुरुवात झाली; मात्र लॉकडाऊन असल्याने प्रवाशांची दरवर्षीप्रमाणे दैना झाली नाही.
     दरम्यान, या पावसाने पुन्हा मुंबईतील नालेसफाईची पोलखोल केल्याचे आरोप होत असून, रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १६०.६ मि.मी. आणि सांताक्रूझ येथे १०२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. महामुंबईत शनिवारी २०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला असून, रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईत विशेषत: कुलाबा-फोर्ट परिसरात शुक्रवारी तुफान पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातही पाणी साचले होते. महालक्ष्मी, मलबार हिल येथील भुलाभाई देसाई मार्गावरही काही ठिकाणी पाणी साचले होते. भायखळा येथे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली. भायखळा पोलिस ठाण्याच्या परिसरातही पाणी साचले होते. चिरा बाजार, वरळी नाक्‍याचा भागही पाण्याखाली गेला होता. नेहमीप्रमाणे हिंदमाता, किंग्ज सर्कल हा भागही जलमय झाला होता.

पश्‍चिम उपनगरात अंधेरी परिसरात सर्वाधिक ११८ मि.मी. पावसाची नोंद झाली. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली होती. घाटकोपर रेल्वेस्थानकाच्या परिसरातही पाणी साचले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडू लागले असून, महापालिकेकडे तक्रारी येत आहेत. सकाळपासून काही भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले; तर काही ठिकाणी रेल्वेमार्गाच्या परिसरातही पाणी साचल्याचे दृश्‍य होते.
 


इतर बातम्या
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...