agriculture news in Marathi high court notice to marketing secretary Maharashtra | Agrowon

पणन संचालकांसह परभणी जिल्हा उपनिबंधकांना खंडपीठाची नोटीस 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर कायदा डावलून सदस्यांची नेमणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत राज्याचे पणन संचालक, परभणी जिल्हा उपनिबंधक यांच्यासह प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

औरंगाबाद ः जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर कायदा डावलून सदस्यांची नेमणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत राज्याचे पणन संचालक, परभणी जिल्हा उपनिबंधक यांच्यासह प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासोर प्रकरणाची सुनावणी झाली. 

या प्रकरणात लोभाजी महादू रेवाळे, ज्ञानोबा बाबूराव मारकड यांनी ॲड. शहाजी घाटोळपाटील यांच्यातर्फे खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार जिंतूर बाजार समितीची शेवटची निवडणूक २००९ मध्ये झाल्यानंतर २०१४ साली कार्यकाळ संपलेला होता. २०१५ ते २०१९ या कालावधीत शासन आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने विविध प्रशासकीय व अशासकीय मंडळ नेमण्यात आले होते.

त्यानंतर शासनाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या आदेशानुसार परभणी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर ९ खासगी अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. त्यानंतर ११ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासकपदी सहायक निबंधकांची नेमणूक केली. त्यानंतर अवघ्या ४० दिवसांत म्हणजेच २२ जानेवारी २०२० रोजीच्या शासनाच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय व्यक्तींची प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. 

शासनाच्या २२ जानेवारीच्या आदेशाला याचिकाकर्त्यांनी खंडपीठात आव्हान दिले. याचिकेत म्हटले, की बाजार समिती कायदा १९६४ च्या कलम १४ (३) नुसार जास्तीत जास्त १ वर्षाची मुदतवाढ संचालक मंडळास देण्यात येते. तर, कलम १५ (अ) नुसार प्रशासक नियुक्ती जास्तीत जास्त १ वर्षासाठी करत येऊ शकते; मात्र कायदा डावलून बाजार समितीच्या निवडणुका न घेता मर्जीतील खासगी अशासकीय व्यक्तींची बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर नियुक्ती केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.

तसेच, मंडळावरील नेमलेले सदस्य हे बाजार समिती कायद्याचे कलम १३ नुसार पात्र नाहीत, तसेच मुख्य प्रशासक मनोज थिटे यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. असे असतानाही कायदा डावलून निवड करण्यात आल्याच्या विरोधात खंडपीठात दाद मागण्यात आली. सुनावणीदरम्यान खंडीपठाने मुख्य सचिव, सहकार व पणन वस्त्रोद्योग विभाग, कक्ष अधिकारी, सहकार व पणन विभाग, पणन संचालक पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था परभणी, सहायक निबंधक जिंतूर, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे, बाजार समिती जिंतूर, तसेच नेमण्यात आलेले ११ अशासकीय सदस्य यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.

याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शहाजी घाटोळपाटील यांनी काम पाहिले. सरकारी वकील मंजूषा देशपांडे काम पाहत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...