अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे दाखल कराः उच्च न्यायालयाचे आदेश

अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे दाखल कराः उच्च न्यायालयाचे आदेश
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे दाखल कराः उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २२) दिले आहेत. २५ हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याचे याचिकेत नमूद आहे. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बँकेच्या ७७ माजी संचालकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कलम ८८ नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सहकारी बँकेच्या ७७ संचालकांसह १० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना सहकार खात्याकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यापुढे बँक डबघाईला आणल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित होऊन आगामी दोन टर्म म्हणजे १० वर्षे आपल्याला निवडणूक लढवण्यास बंदी का घालू नये, अशा आशयाच्या नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. कर्ज वितरणात अनेक गैरप्रकार झाल्याचे नाबार्ड बँकेने २०११मध्ये आपल्या ऑडिटमध्ये स्पष्ट केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने राज्य बँकेवर प्रशासक नेमला होता. बँकेवर वेळोवेळी संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपल्या निकटवर्तीयांना व मर्जीतील लोकांना नियमबाह्यपणे कर्जांचे वितरण केल्याने बँक डबघाईस आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवून चौकशी करावी, अशी विनंती अरोरा यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. या घोटाळ्याप्रकरणी आता येत्या पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईवोडब्ल्यू) दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com