Agriculture news in marathi, high level After monsoon rains in Solapur | Agrowon

सोलापुरात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सोलापूर : गेल्या वर्षी वजा पातळीत असलेले जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प ऑक्‍टोबर महिन्यातील पावसाने ‘प्लस’मध्ये आले आहेत. मांगी (ता. करमाळा) हा प्रकल्प त्याला अपवाद ठरला आहे. बोरी (ता. अक्कलकोट) व पिंपळगाव-ढाळे (ता. बार्शी) हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोलापूर : गेल्या वर्षी वजा पातळीत असलेले जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प ऑक्‍टोबर महिन्यातील पावसाने ‘प्लस’मध्ये आले आहेत. मांगी (ता. करमाळा) हा प्रकल्प त्याला अपवाद ठरला आहे. बोरी (ता. अक्कलकोट) व पिंपळगाव-ढाळे (ता. बार्शी) हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी केवळ ३८ टक्के पाऊस पडला होता. यंदाही सप्टेंबरअखेर पावसाची सरासरी समाधानकारक नव्हती. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा फायदा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प भरण्यासाठी झाला आहे. 

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणकडे असलेल्या सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ मांगी प्रकल्पात अद्याप वजा ०.६३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचा अपवाद वगळता अन्य प्रकल्पांत बऱ्यापैकी पाणीसाठा निर्माण झाला आहे. अक्कलकोट व बार्शी तालुक्‍यात झालेल्या दमदार पावसामुळे बोरी व पिंपळगाव-ढाळे हे दोन्ही मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पिंपळगाव-ढाळे हा प्रकल्प तर एकाच दिवसात भरला. 

सोलापूर शहराच्या जवळ असलेल्या एकरूख मध्यम प्रकल्पात शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. त्याचबरोबर कारंबा शाखा कालव्यातूनही या प्रकल्पात पाणी सोडल्याने त्याच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पहिल्यांदाच उजनीचे पाणी या प्रकल्पात वेगवेगळ्या दोन माध्यमांतून सोडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. 

प्रकल्पनिहाय उपयुक्त पाण्याची टक्केवारी 

प्रकल्प पाणीसाठा
एकरूख  ४४
हिंगणी १८.३०
जवळगाव ४८.४४
मांगी वजा ०.६३ 
आष्टी ७९.०५
बोरी १००
पिंपळगाव-ढाळे १००
एकूण टक्केवारी ४५.९०

 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...