कमी शक्तीच्या ट्रॅक्टरला जास्त शक्तीचा रोटाव्हेटर

कोणत्या ट्रॅक्टरला कोणते अवजार वापरले जाते एवढीसुद्धा तांत्रिक माहिती नसणारे लोक योजना तयार करत असल्यामुळे या चुका होत आहेत. यांच्या चुकांमुळे शेतकरी अडचणीत येतात. शेतीसाठी अवजारांच्या योजना तयार करताना किमान शेतकऱ्यांची मते जाणून घ्यावीत. - अधिकराव देशमुख, शिवाजीनगर, ता. जि. सातारा.
ट्रॅक्टर
ट्रॅक्टर

सातारा: उन्नत शेतकरी समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमात कृषी औजारे, मशिनरी, उपकरणे खरेदीसाठी अर्थसाह्याचे दर शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये जाहीर केलेल्या योजनेत अनेक तांत्रिक चुका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानुसार २० ते ३५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरसाठी पाच फुटी रोटाव्हेटर दिला जाणार असून, हे रोटाव्हेटर संबंधित ट्रॅक्टरला चालणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी शोपीस ठरणार आहेत. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी केंद्र सरकारने २१ अॅागस्ट २०१८ मध्ये केंद्र शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यास पाच डिंसेबर पत्राद्वारे मान्यता देण्यात आली आहेत. यामध्ये सुधारित अनुदानाचे दर जाहीर करण्यात आले आहेत. 

शासनाने जाहीर केलेल्या औजारे व त्याला दिले जाणारे अनुदान यामध्ये अनेक तांत्रिक चुका झाल्या आहेत. यामध्ये कमी क्षमतेच्या वाहनांना जास्त शक्ती औजारांची योजना जाहीर केली आहे. यामुळे अनेक शेतकरी बुचकळ्यात पडणार आहे. २० ते ३५ एचपी ट्रॅक्टरसाठी पाच फुटी रोटाव्हेटर दिला जाणार असून, हे रोटाव्हेटर संबंधित ट्रॅक्टरला चालणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी शोपीस ठरणार आहेत. पाच फुटी रोटाव्हेटर चालण्यासाठी ४५ ते ५५ अश्वशक्ती ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. या क्षमतेचा ट्रॅक्टर असला तर या औजाराचा उपयोग होऊ शकतो. हा प्रकार इतर औजारात झाला आहे. यामध्ये पलटी नांगर हायड्रोलिक दोन बॅाटम, पल्टी नांगर मॅकेनिकल दोन बॅाटम याची क्षमता जास्त असतानाही २० ते ३५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला दिले जाणार आहे. यासारख्या तांत्रिक चुकामुळे शेतकऱ्यांची अडचण ठरणार आहे. औजारे घेऊन त्याच्या उपयोग होणार नसल्याने योजनेचा मुख्य उद्देश हरवून जाणार असून, अनेक शेतकरी या चुकामुळे योजनापासून वंचित रहणार आहेत. 

अनुदान वाढ करण्याची मागणी पॅावर टिलर तसेच ट्रॅक्टर चलित औजारासाठी ४० ते ५० टक्के अनुदान दिले जात आहे. मात्र, मोठ्या अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरना अवघे एक ते सव्वा लाख रुपये अनुदान दिले जाते. हे दिले जाणारे अनुदान रक्कमेच्या तुलनेत कमी आहे. यामुळे किमान सध्या दिले जाणाऱ्या अनुदानाच्या दुप्पट म्हणजेच दोन ते अडीच लाख रुपये अनुदान दिले जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com