Agriculture news in Marathi High prices for turmeric | Agrowon

वाईत हळदीला उच्चांकी भाव

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

बावधन (ता. वाई) येथील शेतकरी गणेश विश्‍वास कदम यांच्या साडेपाच क्विंटल सेलम जातीच्या हळदीला २९ हजार रुपये उच्चांकी प्रतिक्विंटल दर मिळाला.

सातारा : शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे दर तेजीत आहेत. बाजारपेठेत वाढलेल्या मागणीमुळे अनेक वर्षांनंतर हळदीला चांगला दर मिळू लागला आहे. वाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात हळद लिलावात मंगळवारी बावधन (ता. वाई) येथील शेतकरी गणेश विश्‍वास कदम यांच्या साडेपाच क्विंटल सेलम जातीच्या हळदीला २९ हजार रुपये उच्चांकी प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच सरासरी दर नऊ ते १३ हजार इतका निघाला आहे.

या संकटांचा सामना करून शेतकरी हे पीक घेत असतात. मात्र शेतकऱ्यांच्या हातात बाजारपेठेतील दर नसल्याने अनेकदा बाजारपेठेत आवक वाढली, की दर गडगडतात. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. तशीच काहीशी स्थिती हळदीची मागील तीन ते चार वर्षांत झाली. त्यामुळे हळदीचे दर कमी राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित पैसे मिळाले नाहीत. मात्र गेल्या वर्षापासून हळदीला चांगलीच मागणी वाढलेली आहे. त्याचबरोबर मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनामुळेही हळदीचा दैनंदिन वापर वाढला आहे.

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १२ फेब्रुवारीपासून हळदीचे लिलाव सुरू झाले आहे. हळदीस मागणी वाढल्याने दर तेजीत येण्यास सुरुवात झाली आहे. बावधन येथील गणेश विश्‍वास कदम यांच्या सेलम जातीच्या हळदीस क्विंटलला २९ हजार रुपये दर निघाला. तर भुईंज येथील शेतकरी संदीप ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या हळदीला २५ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.

मागील सहा ते सात वर्षांपासून हळदीस दर नसल्यामुळे हळद करणे परवडत नव्हते. यंदा हंगामात मात्र हळदीस दर समाधानकारक मिळत आहे. मी पिकविलेल्या हळदीस मंगळवारी उच्चांकी २९ हजार दर मिळाला.
- गणेश कदम, हळद उत्पादक शेतकरी

शेतकऱ्यांनी चांगल्या दर मिळण्यासाठी तसेच फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली हळद ही वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावी.
- लक्ष्मणराव पिसाळ,
सभापती वाई कृषी उत्पन्न बाजार समिती.


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...