Agriculture news in marathi High quality semen used for Indian cows | Agrowon

देशी गायींसाठी वापरली जाणार उच्च दर्जाची रेतमात्रा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पुणे : देशी गोवंश सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८९ गावांची निवड पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे. या गावांमध्ये देशी व संकरित गाई तसेच म्हैशींसाठी उच्च दर्जाच्या रेत मात्रा वापरण्यात येणार आहे. यामुळे दुधाळ जातिवंत कालवडी शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होणार असून, दूध उत्पादनातही वाढ करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिले. 

पुणे : देशी गोवंश सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८९ गावांची निवड पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे. या गावांमध्ये देशी व संकरित गाई तसेच म्हैशींसाठी उच्च दर्जाच्या रेत मात्रा वापरण्यात येणार आहे. यामुळे दुधाळ जातिवंत कालवडी शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होणार असून, दूध उत्पादनातही वाढ करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिले. 

शेतीपूरक उद्योग म्हणून जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय केला जातो. अलीकडे देशी गायींचे संगोपन वाढत आहे. मात्र दूध उत्पादन कमी असल्याने दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी आणि देशी गाईंचे जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत जिल्ह्यात गोवंश सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील निवड केलेल्या गावांमध्ये देशी आणि संकरित गाई तसेच म्हैशींसाठी उच्च दर्जाच्या रेतमात्रा वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.

देशी गाईंची सुधारणा करण्यासाठी गीर, सहिवाल, खिल्लार तसेच संकरित गाईंसाठी एचएफ आणि म्हशीसाठी मुऱ्हा जातीच्या रेतमात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कृत्रिम रेतन केल्यानंतर इनाफ या संगणक प्रणालीमध्ये ही माहिती नोंदवली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये जनावरांची निवड करून त्यांना कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर पासून यासंदर्भात जिल्ह्यात कामकाजास सुरुवात झाली. मार्च महिन्यापर्यंत एका गावामध्ये किमान १०० कृत्रिम रेतन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे डॉ. विधाटे यांनी सांगितले. 

देशी गोवंश सुधारणा कार्यक्रमात निवडलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या : आंबेगाव १, बारामती ३, भोर ६, हवेली २, जुन्नर ७, मावळ २, शिरूर १६, पुरंदर २, मुळशी ६ खेड ४, दौंड १०, इंदापूर ३०.


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...