agriculture news in Marathi high rate for only some Onion Maharashtra | Agrowon

सर्वाधिक दर मोजक्याच कांद्याला

सुर्यकांत नेटके
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

मोजक्याच कांद्याला दर देऊन कांद्याची खूप दरवाढ झाल्याचे चित्र रंगवले जात आहे. मात्र बहुतांश कांदा सहा ते दहा हजारांत विकला जातोय. आता परदेशांतून कांदा आयात केल्यावर तो चढ्या दराने विकण्यासाठीच अधिक दर मिळत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.
- बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना, नगर 

नगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून सर्व पातळीवर ऊहापोह होत असला, तरी शेतकऱ्यांना मिळत असलेला आणि ग्राहक देत असलेल्या दरात किलोमागे तीस ते चाळीस रुपयांची तफावत असल्याचे दिसत आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये मिळणारा २० ते २१ हजारांचा दर नगण्य गोण्यांनाच मिळत आहे. इतर कांद्याला सरासरी आठ हजारांचाच दर मिळत आहे.

नगरसह राज्यात सध्या केवळ कांद्याच्या दराची चर्चा होत आहे. नगर जिल्ह्यात कमाल दर २१ हजारांपर्यंत, तर सोलापुरात २० हजारांपर्यंत गेला होता. यामुळे बजेट कोलमडल्याची ओरड सर्वच ठिकाणी होत आहे. माध्यमातही कांदादराची चवीने चर्चा होत आहे. कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाला, यावर माध्यमे लक्ष ठेवून आहेत. मात्र घाऊक बाजारात जसा दर वाढेल, तसा किरकोळ बाजारातही दर वाढत आहेत.

असे असले तरी सध्या घाऊक बाजारात शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहक खरेदी करत असलेल्या किरकोळ बाजारातील कांद्याच्या दरात सुमारे तीस ते चाळीस रुपयांची तफावत आहे. घाऊक बाजारात सर्वाधिक मिळणारा दर हा जुन्या गावरान कांद्याला आहे. घाऊक बाजारात ६० रुपये किलोने विकला जाणारा कांदा कोरकोळ बाजारात १०० ते १२० रुपयांनी विकला जात आहे. 

शेतकरी ते ग्राहक यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी शासनाने थेट शेतकरी ते ग्राहक शेतीमाल विक्रीची संकल्पना राबवली. याच संकल्पनेतून मुंबई, पुणे, नगर, नाशिकसह अन्य शहरांत थेट शेतकरी ते ग्राहक शेतीमाल विक्री केंद्रे सुरू केली होती, ती बंद पडल्यानेच बाजारात घाऊक आणि किरकोळ दरांत तफावत असल्याचे दिसत आहे.

विक्रमी दर थोड्याच कांद्याला
नगर जिल्ह्यात नेवासा बाजार समितीत वीस हजार, तर राहुरीत एकवीस हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा गेला. मात्र हा दर बोटावर मोजण्याएवढ्याच गोण्यांना मिळाला. घोडेगाव बाजार समितीत आत्तापर्यंत आवघ्या दोनशे गोण्यांना वीस हजारांचा दर मिळाला. राहुरीत पंचवीस गोण्यांना एकवीस हजारांचा दर मिळाला. अन्य बाजार समित्यांतही हीच स्थिती आहे. बहुतांश कांद्याला ८ हजारांच्या आतच दर मिळत आहे. 

प्रतिक्रिया
कांद्याची मागणी आधारित पुरवठा होणे गरजेचे आहे. असे असेल तर कांद्याला दर टिकून राहील. मात्र दर नसतानाही शासनाने हस्तक्षेप केला तर तो चुकीचा आहे. शिवाय थेट विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली तर शेतकरी आणि ग्राहकांनाही फायदा होईल.
- बाळासाहेब राशीनकर, कांदा उत्पादक शेतकरी, बेलापूर, ता. श्रीरामपूर 

सोमवारी (ता. ९) कांदा दराची स्थिती (प्रतिकिलो / रुपये) 

ठिकाण  घाऊक  किरकोळ
नगर   १० ते १०० ७० ते १३० 
नाशिक  ४३ ते ९६.५१ १०० ते १२० 
सोलापूर  २० ते ११० ९० ते १३०

 


इतर बातम्या
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...