सोलापूर : उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे २०८ कृषिपंपांना वीजजोडणी

उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे  २०८ कृषिपंपांना वीजजोडणी
उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे २०८ कृषिपंपांना वीजजोडणी

सोलापूर : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे ५ हजार ८९४ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील २०८ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा समावेश आहे, अशी माहिती मिळाली.  

जिल्ह्यात उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे ११८७८ कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आतापर्यंत २०८ कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे. उच्चदाब  वीज वितरण प्रणाली राबविण्यासाठी राज्यात ५ हजार ४८ कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १० व १६ केव्हीएचे सुमारे १ लाख ३० हजार इतक्‍या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागतील.

राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू आहेत. या प्रणालीची कामे जलद व उच्च दर्जाची व्हावीत, यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले आहे. व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे.

ही योजना फुल-ट्रंकी व पार्शियल-ट्रंकी अशा दोन प्रकारे राबविण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार आहे. उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये ६०० एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह १०० टक्के कामे एजन्सींना देण्यात आली आहेत. 

येत्या काही दिवसांत या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार आहे. या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com