जागतिक बाजारपेठेत साखर दराचा उच्चांक

जागतिक बाजारपेठेत या सप्ताहात साखर दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत या सप्ताहात सर्वाधिक म्हणजे प्रति टन ५१० डॉलर च्या रुपयाच्या वर पोचला आहे. १ ऑक्टोबर ला तो ५१३ डॉलर वर जाऊन पोचला.
High sugar prices in the global market
High sugar prices in the global market

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत या सप्ताहात साखर दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत या सप्ताहात सर्वाधिक म्हणजे  प्रति टन ५१० डॉलर च्या रुपयाच्या वर पोचला आहे. १ ऑक्टोबर ला तो ५१३ डॉलर वर जाऊन पोचला.  गेल्या दहा ते बारा दिवसापासून सातत्याने ५०० डॉलरच्या वर दर  राहिला. याचा फायदा भविष्यात भारतीय साखरेला होणार आहे.

ब्राझीलच्या सध्या सुरू हंगामात (२०२१-२२) ६० ते ६५ लाख टन साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. दुसरा प्रमुख साखर निर्यातदार देश थायलंडमध्ये मागील वर्षीच्या ७५ लाख टन साखर निर्मितीमध्ये वाढ होऊन १०५ ते ११० लाख टन साखर निर्माण होण्याचा अंदाज आहे.

सध्या ब्राझीलमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ यामुळे ब्राझीलमध्ये उर्वरित हंगामामध्ये साखरेपेक्षा इथेनॉलचे उत्पादन जादा घेतले जात आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ब्राझीलमध्ये जवळ जवळ तीस कारखाने बंद होत आहेत. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पंधरा ते वीस कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतात यंदा सुरू होणारा साखर हंगाम भारतीय कारखानदारीसाठी सुवर्णकाळ आहे. हंगामामध्ये भारतीय कारखानदारांनी गडबड न करता योग्य साखर विक्रीचे धोरण अवलंबिले तर त्यांना साखरेचा परतावा चांगला मिळेल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

जागतिक बाजारातील मागणी व पुरवठा यात जवळ जवळ ३५ ते ४० लाख टनांची कमतरता आहे. ब्राझीलमध्ये पुढच्या वर्षी साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरेल १०० डॉलरवर जाण्याच्या शक्यतेमुळे ब्राझीलमध्ये पुढील हंगामात साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन जादा घेतले जाईल. 

इंडोनेशियामधून मागणी  वाढण्याची शक्यता इंडोनेशिया देशाने मागील वर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कच्ची साखर आयात केली होती. याही वर्षी इंडोनेशियातील मागणी फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात येऊ शकते. त्यामुळे फेब्रुवारीनंतर तयार होणाऱ्या कच्च्या साखरेला चांगला भाव मिळू शकतो. तसेच रिफाईन साखरेच्या दरामध्ये  होत असलेल्या वाढीमुळे पांढऱ्या साखरेलाही निर्यातीसाठी चांगली मागणी येऊ शकते.

...अशी आहे सद्यःस्थिती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन हंगामात कच्च्या साखरेला चांगला दर मिळू शकेल. एस ३० साखर सध्या कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे तसेच १२ सप्टेंबरपासून रिफाईन साखरेच्या दरामध्ये जवळ जवळ १५ ते १६ टक्के वाढ झाली आहे. यामुळे नवीन हंगामात एस ३० साखरेला सुरुवातीपासूनच चांगली मागणी येईल. १५ सप्टेंबरला झालेल्या लंडन वायदे बाजाराच्या ऑक्टोबर क्लोजिंगनंतर रिफाईन साखरेच्या दरामध्ये जवळ जवळ सोळा टक्के वाढ झाली व ती अजूनही होण्याची शक्यता आहे. रिफाईन साखरेच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे भविष्यात जागतिक बाजारातील रिफायनरीकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या साखरेची मागणी होईल. भारतीय कारखानदारांनी साखर विक्रीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

सरकारने देशांतर्गत बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यामध्ये दिलेला साखर विक्रीचा जादा कोटा दिला आहे. तरीही कारखान्यांनी न डगमगता साखर विक्रीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सर्व साखर कारखानदारांनी कारखाने सुरू करताना कच्च्या साखरेच्या निर्मितीचा विचार न करता सुरुवातीला पांढरी साखर व फेब्रुवारीपासून हंगाम संपत येताना जर कच्च्या साखरेचे उत्पादन केले, तर त्यांना देशांतर्गत साखर तसेच निर्यात साखरेला चांगला भाव मिळू शकेल. सप्टेंबर अखेरला झालेले  न्यूयॉर्क वायदे बाजाराचे क्लोजिंग, तसेच ब्राझीलच्या युनिकाचा रिपोर्ट बघून कच्ची साखर निर्यातीचे करार करावेत.  - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com