agriculture news in Marathi high temperature in brahmpuri Maharashtra | Agrowon

ब्रह्मपुरीत उच्चांकी तापमान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 मार्च 2021

विदर्भातील काही भागांत उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा अनेक भागांत वाढू लागला आहे. येत्या काळात विदर्भासह इतर भागातही उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे.

पुणे : विदर्भातील काही भागांत उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा अनेक भागांत वाढू लागला आहे. येत्या काळात विदर्भासह इतर भागातही उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी (४३.३ अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्यात कोरडे हवामान असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे उन्हाचा चटका वाढत असल्याने सकाळपासून झळा तीव्र होत आहेत. दहा वजल्यापासून उन्हाचा पारा वाढत जाऊन तो चाळिशी ओलांडत आहे. सध्या विदर्भाच्या काही भागांत काही प्रमाणात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे राज्यातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. इतर भागांतही कमाल तापमानात काही अंशी किंचित वाढ झाली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्र आणि परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागराचा आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, ती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागांत आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, ते अंदमानाच्या उत्तर भागात सरकेल. हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भागात त्यांचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्र असून त्याचे चक्रीय वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असल्याने काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढत आहे. 

मंगळवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३४.६ 
 • अलिबाग ३१.४ 
 • रत्नागिरी ३३.३ 
 • डहाणू ३१.५ 
 • पुणे ३९.३ 
 • जळगाव ४१.५ 
 • कोल्हापूर ३९.५ 
 • महाबळेश्‍वर ३२.९ 
 • मालेगाव ४२ 
 • नाशिक ३९.१ 
 • सांगली ३९.८ 
 • सातारा ३८.९ 
 • सोलापूर ४१.५ 
 • औरंगाबाद ३९.७ 
 • परभणी ४१.१ 
 • नांदेड ३८.५ 
 • अकोला ४२.८ 
 • अमरावती ४१.८ 
 • बुलडाणा ४० 
 • ब्रह्मपुरी ४३.३ 
 • चंद्रपूर ४२.८ 
 • गोंदिया ४०.८ 
 • नागपूर ४१.५ 
 • वर्धा ४२  

इतर अॅग्रो विशेष
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...