ब्रह्मपुरीत देशातील उच्चांकी तापमान

तापमान
तापमान

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे. या लाटेमुळे उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे ४५.६ अंश सेल्सिअस देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सागितले.  सध्या विदर्भात पुन्हा हवामान कोरडे आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णता वाढली आहे. या उष्णतेमुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून चटका वाढला आहे. परिणामी, विदर्भात पुन्हा पारा वाढून ४५ अंशांपर्यंत गेला आहे. येत्या दोन ते दिवसांत या भागात उष्णता वाढणार आहे. विदर्भातील  चंद्रपूर, वर्धा, वाशीम, अकोला, नागपूर येथेही तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी येथेही पुन्हा तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात ढगाळ हवामान असल्याने किंचित घट झाली आहे.  अवकाळीची शक्यता  छत्तीसगड व परिसर ते उत्तर कर्नाटक यादरम्यान असलेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच लक्षद्वीपचा परिसर आणि अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड ते २.१ किलोमीटर यादरम्यान आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात शुक्रवारपासून अंशतः ढगाळ हवामान राहील. तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळी साडे आठ वाजेपर्यतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.६ (१.९), जळगाव ४२.२ (-०.८), कोल्हापूर ३८.६ (२.०), महाबळेश्‍वर ३३.६ (२.३), मालेगाव ४२.६ (२.३), नाशिक ३८.३ (०.१), सांगली ३९.२ (१.०), सातारा ३९.३ (२.३), सोलापूर ४२.२ (१.४), सांताक्रुझ ३२.८ (-०.५), अलिबाग ३२.० (-०.६), रत्नागिरी ३३.६ (१.०), डहाणू ३३.५ (-०.३), औरंगाबाद ४०.० (०.४), बीड ४२.१ (१.८), नांदेड ४३.०(१.३), परभणी ४३.३ (१.४), उस्मानाबाद ४१.२ (१.८) अकोला ४२.९ (०.६), अमरावती ४१.४ (-१.१), बुलडाणा ४०.० (१.४), ब्रम्हपुरी ४५.६ (३.५), चंद्रपूर ४४.८ (२.०), गोंदिया ४१.६ (-०.४), नागपूर ४२.३ (०.१), वर्धा ४३.४ (०.६), वाशीम ४२.०, यवतमाळ ४१.२ (-०.८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com