वाढलेल्या तापमानाची आंबा बागांना झळ 

उष्णता वाढल्यामुळे झाडांना ताण बसतो. त्यामुळे फळगळ सुरू होते. शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी झाडांना पाणी द्यावे. पाणी दिल्यास ९० टक्के फळगळ कमी होईल. - डॉ. बी. एन. सांवत, सहयोगी संशोधक संचालक, फळसंशोधन केंद्र वेंगुर्ला
mango damage
mango damage

सिंधुदुर्ग: कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जिल्हयातील आंबा बागायतदारांना आता वाढलेल्या तापमानामुळे फळगळीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेला आंबा गळुन पडत असल्यामुळे बागायतदारांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. कातळावरील बागांना याचा अधिक फटका दिसत आहे.  जिल्ह्यातील हापुस आंबा हंगाम सुरू होत असतानाच कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे देश, परदेशात निर्यात होणाऱ्या हापुसला मर्यादा आल्या. शासनाने आंबा वाहतुकीस परवाने दिले परंतु कोरोनाच्या भितीमुळे आंबा विक्री करणे जिकरीचे झाले. या भयावह संकटातून आंबा बागायतदार संक्रमण करीत असतानाचा आता वाढत्या तापमानाची झळ आंबा बागांना बसत असल्याचे चित्र जिल्हयात पाहायला मिळत आहे.  बागांमध्ये फळगळीचे प्रमाण वाढले असुन झाडाखाली फळांचा खच पाहुन बागायतदार चलबिचल झाले आहेत. परिपक्व झालेली फळे गळून पडत असल्यामुळे काय करावे हे बागायतदारांना सुचत नाही. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होत असल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  कातळावरील बागांमध्ये फळगळीचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत डोंगरांमध्ये असलेल्या बागांना तापमानाचा फटका तितकासा बसताना दिसत नसल्याचे चित्र आहे.  शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फळगळीला ही नुकतीच सुरूवात झाली आहे. वाढलेले तापमान पाहता आणखी चार दिवसांनी फळगळीचे प्रमाण वाढणार आहे. जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंबा लागवड क्षेत्र आहे. त्यातील अधिकतर आंब्याच्या बागा या कातळावर आहे. त्यामुळे फळगळीचा धोका त्या भागात अधिक जाणवण्याची शक्यता आहे.  यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातही कोरोनासारख्या संकटाला बागायतदार सामोरे जात असताना आता फळगळीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे लागत आहे. एका मागुन एक येत असलेल्या संकटामुळे बागायतदार हवालदिल आहे. 

प्रतिक्रिया

माझी हापुसची २०० झाडे आहेत. या झाडांपासुन साधारणपणे मला १५० पेटी आंबा मिळायचा. परंतु यावर्षी वातावरणातील बदलामुळे १०० पेटी मिळेल, अशी अपेक्षा होती. सध्या वाढलेल्या उष्म्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू आहे. फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आता ६० ते ७० पेटी माल मिळेल का? हा प्रश्‍न आहे. त्यातच यावर्षी तीन टप्प्यात झाडांना मोहोर आला. त्यामुळे आंबा काढणी जटील झाली आहे.  - सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोरे वेंगुर्ला   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com