agriculture news in marathi, high voting in kolhapur, maharashtra | Agrowon

उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ चर्चेत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उच्चांकी मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली आहे. 

कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उच्चांकी मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. उन्हाच्या तडाख्याने सर्वत्र मतांची टक्‍केवारी घटली असताना या मतदारसंघात उच्चांकी मतदान झाले. निवडणुकीत विविध समीकरणांमुळे बऱ्याच वेळा ही निवडणूक वर-खाली झाली. अनेक चढउतार या निवडणुकीत पहायला मिळाले. हक्‍काचे मतदान घेण्यासाठी पोलिंग बूथवर मतदानाची स्लीप नेईपर्यंत चढाओढ पहायला मिळाली. सायंकाळी मतदान संपल्यानंतर आता झालेले मतदान कोणाला, किती झाले याचा शोध सुरू झाला आहे. शहर आणि गावात, प्रमुख नेत्यांच्या घरात ही आकडेमोड सुरू झाली असून, या आधारेच आता पैजाही लागू लागल्या आहेत. 

निवडणुकीच्या काळात पडद्यामागून झालेल्या घडामोडी, पैशांचा झालेला वारेमाप वापर, वंचित बहुजन आघाडीचा फटका यामुळे निकाल काय लागणार याची कमालीची उत्सुकता मतदारसंघात लागून राहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीचा निकाल महिनाभराने म्हणजे २३ मे रोजी लागणार असल्याने दररोज नवीन वावड्या आणि चर्चेमुळे उमेदवार आणि समर्थक मात्र ‘गॅस’वर राहणार आहेत. कोण कोणाचा उघड तर कोण कोणाचा छुपा प्रचार करत होते, याची मात्र आता उघड चर्चा सुरू झाली आहे. मतदानादिवशीच काहींनी पार्टी बदल करून विरोधी उमेदवाराला मदत केली. अशा घटना कोठे-कोठे घडल्या व का घडल्या याचीही चर्चा सुरू आहे.

कोणी आर्थिक मदतीवर, कोणी नोकरीच्या तर कोणी पदाच्या लालसेने उलट-सुलट उमेदवारांना मदत केल्याची माहिती पुढे येत आहे. पडद्यामागील घडामोडींमुळे वर-वर बांधले जाणारे अंदाज चुकण्याची शक्‍यता असल्याने उमेदवारांसह गट-तटाचे प्रमुखही हादरून गेले आहेत. लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभेची रंगीत तालीम झाली आहे. दूर गेलेले गट जवळ करणे तसेच जवळची नाराज मंडळी दुसऱ्या कंपूत जाण्याचा प्रकार या निवडणुकीत घडला आहे. याचे पडसाद विधानसभा निवडणुकीदरम्यान उमटू नयेत यासाठी आत्तापासूनच विधानसभेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...