Agriculture news in marathi Higher rates from co-operative factories than from private sugar factories | Agrowon

‘खासगी’पेक्षा ‘सहकारी’च गोड

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

सरलेल्या २०१९-२० या हंगामात पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यात खासगीपेक्षा `सहकार`च भारी ठरला आहे. अडीच हजार रुपये प्रतिटनापेक्षा जास्त भाव मिळवून देण्यात सहकारातील सोमेश्वर, भीमाशंकर, विघ्नहर, माळेगाव यशस्वी ठरले आहेत.

सोमेश्वरनगर, जि. पुणे ः सरलेल्या २०१९-२० या हंगामात पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यात खासगीपेक्षा `सहकार`च भारी ठरला आहे. अडीच हजार रुपये प्रतिटनापेक्षा जास्त भाव मिळवून देण्यात सहकारातील सोमेश्वर, भीमाशंकर, विघ्नहर, माळेगाव यशस्वी ठरले आहेत. खासगीपैकी ही कामगिरी दौंड शुगर व पराग अॅग्रोने केली आहे. दरम्यान, एफआरपीपेक्षा जास्त भाव देणे सोमेश्वर, अनुराज, भीमाशंकर, दौंड शुगर, माळेगाव या पाच कारखान्यांना शक्‍य झाले आहे. 

२०१९-२० च्या हंगामात अतिरीक्त साखरेचे संकट आणि कोरोनामुळे साखरेचा उठाव ठप्प यामुळे कारखाने आर्थिक गर्तेत गेले होते. राज्यभरातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीवर (रास्त व उचित दर) बोळवण केली. पुणे जिल्ह्यात छत्रपती, विघ्नहर, संत तुकाराम, घोडगंगा, नीरा भीमा, कर्मयोगी, राजगड या सहकारी कारखान्यांनी तर व्यंकटेश, श्रीनाथ म्हस्कोबा, पराग अॅग्रो, बारामती अॅग्रो या खासगीनी शेतकऱ्यांना एफआरपीवर समाधान मानायला लावले.

मागील वर्षी राज्यात सर्वाधिक भाव देणाऱ्या माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा फक्त पन्नास रुपये जास्त दिले आहेत. त्या तुलनेत भीमाशंकर कारखान्याने डिस्टिलरी प्रकल्प नसतानाही प्रतिटन २८४० रूपये देऊन उत्तम कामगीरी केली. पराग अॅग्रो या नवख्या कारखान्यानेही चांगली कामगिरी केल्याचे दिसते. चांगला उतारा राखण्यातही सोमेश्वर, भीमाशंकर, माळेगाव, विघ्नहर आघाडीवर असल्याने एफआरपी जास्त आहेत. या बाबत खासगीकडून दौंड शुगर, पराग अॅग्रो सहकाराला आव्हान देत आहेत.

`सोमेश्वर` प्रथम; `राजगड` निचांकी 
माळेगावने मागील हंगामाच्या तुलनेत ६५० तर सोमेश्वरने मागील हंगामाच्या तुलनेत प्रतिटन ३०० रुपये कमी दर दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. असे असले तरी आकडेवारी पाहता सोमेश्वरने (प्रतिटन ३०००) राज्यात द्वितीय क्रमांकाचा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा दर दिला आहे. त्यापाठोपाठ जिल्ह्यात भीमाशंकर, माळेगाव, दौंड शुगर अशी उतरंड आहे.

राजगड कारखान्याने सर्वांत कमी (प्रतिटन २३००) दर दिला आहे. त्यानंतर नीरा भीमाचा (प्रतिटन २३४८) क्रमांक आहे. तर एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यात अनुराज (प्रतिटन २३६ रूपये), सोमेश्वर (प्रतिटन २११ रुपये), भीमाशंकर (प्रतिटन १५० रुपये) आघाडीवर आहेत. दौंड शुगर या एकमेव खासगी कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा (प्रतिटन ५० रुपये) जादा दिले आहेत.

कारखानानिहाय एफआरपी (प्रति टन)      

   

कारखाना साखर उतारा (%) एफआरपी अंतिम भाव 
सोमेश्वर       १२.१८          २७८८  ३०००
भीमाशंकर ११.८५       २६८९      २८४०
माळेगाव    ११.७६    २६९३  २७५० 
छत्रपती ११,०० २४७२ २५०० 
विघ्नहर  ११.६५ 
 
 २५७३  २५७५ 
संत तुकाराम  ११.४५      २५०४     २५०४ 
घोडगंगा   ११.२५     २४८०   २४८० 
नीरा भीमा  १०.६६  २३४७ २३४८ 
कर्मयोगी    ११.२५  २४७३  २४७५ 
राजगड १०.६६ २३०० २३०० 
बारामती अॅग्रो ११.६०  २४९१  २५०० 
दौंड शुगर  १२.१४  २७१० २७५० 
व्यंकटेश       ११.३०   २४९४  २५००
श्रीनाथ म्हस्कोबा ११.३५  २५१६ २५२० 
अनुराज शुगर  १०.६४  २२६६ २५०० 
पराग अॅग्रो  ११.८२ २६०१ २६०२

 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...